⚡मालवण ता.२९-: कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवाराच्या हडी गावातील गाबीत वाडा येथे मूळपुरुष स्थानाचा वार्षिक उत्सव दि. ३ मे रोजी साजरा होणार आहे.
कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवाराच्या हडी गावातील गाबीत वाडा येथे मूळपुरुष स्थानावर गतवर्षी छोटेखानी मंदिराची उभारणी करण्यात आली होती. तसेच मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यास दि. ३ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने मूळपुरुष स्थानाच्या मंदिराचा वार्षिक उत्सव ३ मे रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद व इतर कार्यक्रम होणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा तसेच इतर ठिकाणी विखूरलेल्या कालमेतर, मेतर, मेथर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवारातील सर्व बंधू- भगिनींनी हडी येथे वार्षिक उत्सवास उपस्थित रहावे, तसेच अधिक माहितीसाठी देविदास कालमेथर (मालवण) 9403368591, भिकाजी लोणे (नालासोपारा) 9326473874 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
