⚡कणकवली ता.२९-: फोंडा विभागातील येथील शिवसेनेचे उबाठा गटाचे कार्यकर्ते दीपक लाड, अशोक लाड, सत्यवान रावराणे, ओमकार लाड, सुधीर लाड, सदानंद लाड, भगवान गोसावी, प्रतीक लाड, विनायक गोसावी, प्रणय लाड, यश लाड, दत्तगुरु गुरव, भाऊ लाड यांनी आमदार नीतेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेक्षकर्त्यांचे राणेंनी स्वागत केले. पक्षप्रवेशाच्यावेळी माजी सभापती मनोज रावराणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राजन चिके, मामा हळदिवे, संतोष कानडे, सुरेश सामंत, सुजाता हळदिवे, संजना आग्रे आदी उपस्थित होते. आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…
