बाजारपेठेतील साईबाबा मंदिर येथे प्रचाराचा केला शुभारंभ..
⚡सावंतवाडी ता.२९:-: महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरातील युवासैनिक मैदानात उतरले. बाजारपेठेतील साईबाबा मंदिर येथे सोमवारी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी शहरप्रमुख बाबु कुडतरकर म्हणाले, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ मताधिक्य मिळवून देऊ. युवा सैनिकांची ताकद आमच्या सोबत असल्यामुळे नारायण राणेंचा विजय निश्चित आहे असा विश्वास बाबु कुडतरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी बाजारपेठ महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यानंतर बाजारपेठ युवासेनेकडून प्रचार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, माजी नगरसेविका भारती मोरे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर, शहरप्रमुख अर्चित पोकळे, देव्या सुर्याजी, वर्धन पोकळे, राघवेंद्र चितारी, बबलू मिशाळ, निखिल सावंत, प्रथम मुद्राळे, प्रथमेश प्रभू, वसंत सावंत, पंकज बिद्रे, अर्षद बेग, शैलेश तळवडेकर, हर्षद कर्पे, विकास चव्हाण, ओंकार गवळी, गणेश गिरी आदी युवा सैनिक उपस्थित होते.
