राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा…

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे कुंभवडेत आवाहन..

⚡दोडामार्ग ता.२९-:
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कुंभवडे येथे केले.
मंत्री दीपक केसरकर यांनी राणे यांच्या प्रचाराचा प्रारंभ तेरवण येथून केला.यावेळी त्यांनी कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.ते केवळ मातोश्रीवर बसून पक्ष चालवू शकतात. पण, मंत्रालयात येऊन सर्वसामान्यांसाठीचे सरकार चालवू शकत नाहीत. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १८ – १८ तास जनतेला त्यांच्या कामासाठी, विकासासाठी भेटत असतात असेही ते म्हणाले.
केसरकर म्हणाले, येथील जनतेने माझ्यासाठीच खासदार विनायक राऊत यांना त्यावेळी मतदान केले. मात्र, आता त्यांचा पराभव निश्चित आहे. नारायण राणे यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मी कंबर कसली आहे, असेही मंत्री केसरकर म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, विभागप्रमुख मायकल लोबो, प्रवीण गवस, महिला उपजिल्हा प्रमुख मनिषा गवस, विजय गावडे व शिवसेना कार्यकर्ते आणि तेरवण, कुंभवडे गावातील ग्रामस्थ मोठ्या
संख्येने उपस्थित होते. केसरकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाची प्रगती झपाट्याने होत आहे. त्यांच्यासाठी देश
हाच सर्वोतोपरी आहेत. सर्वांसाठीही देश हाच सर्वोतोपरी असायला हवा. मात्र, इतर पक्षांसाठी देश हा सर्वोतोपरी नसून त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष त्यांना महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वजण ते एकत्र येऊन आपला स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न करत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

कोणाकडे पैशासाठी जाण्याची गरज नाही

माझ्या पणजोबापासून आमचा व्यवसाय आहे. आम्ही मुळातच श्रीमंत आहोत.त्यामुळे आम्हाला कोणाकडे पैशासाठी जाण्याची गरज लागत नाही. मी माझ्या पदरचे पैसे खर्च करून राजकारण व समाजकारण करत आहे. त्यामुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माझी बदनामी करण्याआधी स्वतःकडे कोणत्या मार्गाने पैसा येतो ते सांगावे ,असेही मंत्री केसरकर म्हणाले.

You cannot copy content of this page