Headlines

एस टी आगाराचे काम निकृष्ट दर्जाचे…

भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कामाची पाहणी.. ⚡वेंगुर्ले ता.१६-: येथील आगाराचे सध्यस्थितीतील सुरू असलेले नूतनीकरणाचे काम हे चुकीच्या पद्धतीचे आणी निकृष्ट दर्जाचे असून चुकीचे अंदाजपत्रक असल्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या नेतृत्वाखाली सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांनी या कामाची पाहणी करत…

Read More

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक व जलक्रीडांना १० जून पर्यंत मुदतवाढ मिळावी…

आम. वैभव नाईक; मेरिटाईम बोर्डाकडे केलि मागणी.. मालवण : (प्रतिनिधी) ऐन पर्यटन हंगामात गेले महिनाभर लोकसभा निवडणूकीची धामधूम, त्यामुळे पर्यटकांची कमी झालेली संख्या आणि आता संपत आलेला पर्यटन हंगाम यामुळे मालवणातील पर्यटन व्यावसायिक आधीच चिंताग्रस्त असताना मेरीटाइम बोर्डाने नियमावर बोट ठेवत पावसाळी हंगामासाठी २५ मे पासून जालक्रीडा व सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याच्या दिलेल्या…

Read More

‘तिमिरातुनि तेजाकडे’ संगीत अल्बममधील गीतकार व बागायतचे सुपुत्र विजय जोशी यांचा गौरव…

⚡मालवण ता.१६-: स्वरकुल ट्रस्ट आणि त्यागराज म्युझिक अकॅडमी निर्मित ‘तिमिरातुनि तेजाकडे’ ह्या भारतातील पहिल्या अंध दिव्यांग गायकांची दहा गाणी समाविष्ट असलेल्या संगीत अल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे नुकतेच संपन्न झाले.या अल्बम मध्ये मसुरे (खेरवंद वाडीचे) सुपुत्र कवी गझलकार समीक्षक साहित्यिक व गीतकार विजय जोशी (विजो) यांच्या…

Read More

मालवणी बझारच्या ग्राहक भेट योजना सोडतीचा निकाल जाहीर…

⚡मालवण ता.१६-:मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवण तर्फे ग्राहक सभासदांसाठी मालखरेदीवर ग्राहक भेट योजना जाहीर करणेत आलेली. जाहिर करण्यात आलेल्या भव्य ग्राहक भेट योजना सोडतीचा निकाल जाहीर झाला आहे. संस्थेच्या मालवण कट्टा व आचरा या शाखांमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी भाग्यवंत विजेत्या ग्राहकांना भेटवस्तू देऊन…

Read More

शेतकरी अाक्रमक, सावडाव धरणाचे काम पाडले बंद…

⚡कणकवली ता.१६-: फोंडाघाट मृद व जलसंधारण विभागाच्या उपविभागीय कार्यालयाकडून सावडाव धरणाचे काम सुरु आहे . सदर काम शेतक-यांना जमीन भुसंपादनाचा मोबदला न देताच केवळ संयुक्त मोजणीची नोटीस देत काम सुरु केले. धरणग्रस्त शेतक-यांनी गुरुवारी थेट धरण परिसरात जावून ठेकेदाराला जाब विचारत काम बंद पाडले. वडीलोपार्जित असलेल्या आम्हा शेतकऱ्यांच्या जमिनीवर दांडगाईने ठेकेदाराने काम सुरु केले आहे….

Read More

पन्नास फुट टाकीवर चढत विलास जाधव यांचे अनियमित पाणीपुरवठय़ावर वेधले लक्ष…

समाज मंदिर परिसरातील घटना: जोपर्यंत टाकी पूर्ण क्षमतेने भरत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही; पालिका प्रशासनाला दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१६-: शहरातील समाजमंदिर परिसरात वारंवार अनियमित पाणीपुरवठा होत असल्यानं माजी नगरसेवक विलास जाधव यांनी थेट सुमारे पन्नास फूट उंचीच्या टाकीवर चढत निषेध व्यक्त केला आहे. वारंवार लक्ष वेधून देखील नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचं त्यांचे म्हणणे आहे….

Read More

आंबोली घाटात आयशर ट्रक व टेम्पोमध्ये अपघात…

कोणालाही दुखापत नाही; ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान.. ⚡आंबोली ता.१६-: येथील घाटातील धोकादायक वळणावर आयशर ट्रक व टेम्पो यांच्यात अपघात झाल आहे. सुदेवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी आयशर ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान घटनास्थळी आंबोली दूरक्षेत्रावरील पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन वाहतूक सुरळीत केली.

Read More

कणकवली अवकाळी पावसाची हजेरी…

ठिकठिकाणी पडझडीच्या घटना : अनेक गावांमधील विद्युत पुरवठाही खंडित.. ⚡कणकवली ता.१६-: तालुक्यात दुपारच्या सत्रात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी तालुक्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पावसामुळे अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.हळवल गावात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले होते. याच गावात काही ठिकाणी शेत घर व शेती पंचावरील छप्पर उडून…

Read More

खारेपाटणमधील नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद…

कणकवली : भगवान गौतमबुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबसाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त बौद्ध सेवा संघाच्या खारेपाटण विभागातर्फे खारेपाटण-पंचशीलनगर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. याचा 50 जणांनी लाभ घेतला.या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत कांबळे, डॉ. सिद्धार्थ तांबे, अशोक कांबळे, पत्रकार संतोष पाटणकर, संदीप पाटणकर, मनोज पाटणकर,…

Read More

गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाची उभारणी…

⚡कणकवली ता.१६-: शिवशौर्य प्रतिष्ठान व कोकण परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा येथील गगनगडावर हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ गगनगडाचेे ट्रस्टी संजयसिंह पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उभारण्यात आला. यावेळी दिगंबर राऊत, अजित कुडकर, प्रसाद भोई, गणेश माने, साई इंगळे, सुजित शेंगाळे, साक्षी इंगळे, अमामिका भगत, प्रवीण शेंगाळे, दशरथ इंगळे, देविदास शेंगाळे यांच्यासह दुर्गसेवक, धारकरी बंधू, रणरागिणी,…

Read More
You cannot copy content of this page