⚡मालवण ता.१६-:
मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लि. मालवण संचलित मालवणी बझार मालवण तर्फे ग्राहक सभासदांसाठी मालखरेदीवर ग्राहक भेट योजना जाहीर करणेत आलेली. जाहिर करण्यात आलेल्या भव्य ग्राहक भेट योजना सोडतीचा निकाल जाहीर झाला आहे. संस्थेच्या मालवण कट्टा व आचरा या शाखांमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी भाग्यवंत विजेत्या ग्राहकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
मालवणी बझारच्या मालवण येथील शाखेत संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोहिते, उपाध्यक्ष श्री. एम. आर. सोनवडेकर, संचालक मंडळ सदस्य श्री. एस. डी. तळवडेकर, श्री. एस. एम. गवंडी, श्री. व्हि. व्हि. मालंडकर, श्री. पी. आर. पारकर, सौ. जे. एस. इडकर, संस्थेचे जेष्ठ सभासद, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. व्ही. परब व ग्राहक, कर्मचारी यांच्या उपस्थितीत सोडतीचा निकाल जाहीर झाला.
सोडतीचा निकाल पुढीलप्रमाणे –
मालवण शाखा – प्रथम – उमेश विलास हडकर, (धुरीवाडा मालवण), द्वितीय- तुषार परब, (न्हिवे- कोळंब मालवण) तृतीय- शारदा मधुकर कदम, (धुरीवाडा मालवण) व प्रतिभा व्यंकटेश गवंडी (गवंडीवाडा मालवण), चतुर्थ क्रमांक – सागर गोविंद परब, (न्हिवे) व संजय वासुदेव कांबळी, (रेवंडी), पाचवा क्रमांक – डस्टबिन (संख्या १०), उत्तेजनार्थ बक्षिस – बाथस्टूल (संख्या १०).
कट्टा शाखा – प्रथम प्रशांत गोठणकर, (गुरामवाड), द्वितीय – प्रमोद शामसुंदर परब (गुरामवाड), तृतीय – गीता सोमा परब (वराड देऊळवाडी) व श्री. सतिश मगावडे (मोगरणे) चतुर्थ – मनिषा कदम (चौके) व अनिल फणसेकर (कावळेवाडी), पाचवा क्रमांक – बक्षिस डस्टबिन (संख्या १०), उत्तेजनार्थ बक्षिस- बाथस्टूल (संख्या १०).
आचरा शाखा- प्रथम- निलेश कासले, (चिंदर), द्वितीय- अनंत सावंत, (आचरा), तृतीय – प्रतिमा सावंत (मुणगे) व प्रांजल कदम (बौध्दवाडी वायंगणी), चतुर्थ – हिमाली अमरे. (पाटणवाडी) व यशवंत तेली (साटमवाडी त्रिंबक), पाचवा क्रमांक- डस्टबिन (संख्या १०) उत्तेजनार्थ बक्षिस बाथस्टूल (संख्या १०).
भाग्यवंत ग्राहकांना सोडत जाहीर झाल्यानंतर संस्था अध्यक्ष प्रमोद मोहिते, उपाध्यक्ष एम. आर. सोनवडेकर व संचालक मंडळ सदस्यांच्या हस्ते भाग्यवान ग्राहकांना भेट वस्तु देऊन सन्मानित करण्यात आले. ग्राहकांनी संस्थेचे या नावीन्यपूर्ण उपकमाचे कौतूक केले. भेट योजनेस ग्राहकांनी उस्फुर्द प्रतिसाद दिल्याबदद्ल मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. परब यांनी ग्राहकांचे आभार मानले. उर्वरित विजेत्यांनी आपली बक्षिसे संबंधित शाखेतून घेऊन जावीत, असे आवाहन मालवणी बझार तर्फे करण्यात आले आहे.
