कोणालाही दुखापत नाही; ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान..
⚡आंबोली ता.१६-: येथील घाटातील धोकादायक वळणावर आयशर ट्रक व टेम्पो यांच्यात अपघात झाल आहे. सुदेवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली तरी आयशर ट्रकचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. दरम्यान घटनास्थळी आंबोली दूरक्षेत्रावरील पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन वाहतूक सुरळीत केली.
