कणकवली अवकाळी पावसाची हजेरी…

ठिकठिकाणी पडझडीच्या घटना : अनेक गावांमधील विद्युत पुरवठाही खंडित..

⚡कणकवली ता.१६-: तालुक्यात दुपारच्या सत्रात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. परिणामी तालुक्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. पावसामुळे अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
हळवल गावात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले होते. याच गावात काही ठिकाणी शेत घर व शेती पंचावरील छप्पर उडून गेले. कळसुली बौद्धवाडीत 11 केव्हीची विद्युत लाईन तुटल्याने दोन विद्युत पोल कोसळले. कळसुली परिसरात काही जणांचे घरांचे छप्पर कोसळले. साकेडी-फौजदारवाडीतील रामचंद्र घाडी यांच्या घराच्या मागील पडवी व गोठयावर चिंचेच्या झाडाची फांदी पडल्याने नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सह्याद्री पट्टयात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह शहरात झालेल्या पावसामुळे सर्वत्र धुळीचे लोट उडाले.पावसामुळे हवेत गरावा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

You cannot copy content of this page