कणकवली : भगवान गौतमबुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबसाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त बौद्ध सेवा संघाच्या खारेपाटण विभागातर्फे खारेपाटण-पंचशीलनगर येथे मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले होते. याचा 50 जणांनी लाभ घेतला.
या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत कांबळे, डॉ. सिद्धार्थ तांबे, अशोक कांबळे, पत्रकार संतोष पाटणकर, संदीप पाटणकर, मनोज पाटणकर, महेंद्र कदम, दीपक पगारे, सत्यवान जाधव, दीपक जाधव आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन कोर्लेकर यांनी केले. आभार महेंद्र कदम यांनी मानले. या शिबिरात खारेपाटण परिसरातील 50 नागरिकांनी लाभ घेतला. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी डॉ. सिद्धार्थ तांबे यांचे सहकार्य लाभले.
खारेपाटणमधील नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद…
