Headlines

चराठा गावठणवाडीत घरावर माड कोसळला..

मायलेक थोडक्यात बचावले:दीड लाखांचे नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.०८-: चराठा गावठणवाडी येथील अरुण धोंडू परब यांच्या घरावर माड कोसळून घराच्या छपरासह आतील वस्तूंचे सुमारे १,४७,५०० रुपयांचे नुकसान झाले. या घटनेच्या वेळी चिमुकल्यासह त्याची आई होती मात्र सुदैवानेच दुर्घटना टळली. हा माड कोसळताना मोठा आवाज आल्याने शेजारी धाऊन आले. मात्र कोणताही अनर्थ न घडल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला….

Read More

वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मार्गावर वीज वितरणमार्फत झाडी कटिंग मोहीम…

आडेली खुटवळवाडीतील वीजपुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त.. ⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह सरपंच संघटनेने कुडाळ विद्युत वितरण कार्यालय येथे धडक देत वीज पुरवठा तसेच मेंटेनन्स ची कामे तातडीने करण्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. याची तातडीने दखल घेत वेंगुर्ला वीज वितरण मार्फत वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी कडे जाणाऱ्या मार्गावरील विद्युत लाईनवरील झाडी कटिंग काम करण्यास…

Read More

बीएलओ ड्युटीतून मुक्ततेसाठी उद्या प्राथमिक शिक्षकांचा शाळा बंद आंदोलन…

जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा.. ⚡ओरोस, ता.०८-: बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या शैक्षणिकेतर जबाबदाऱ्यांमधून पूर्णपणे मुक्तता, २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टी ई टी परीक्षेतून सूट तसेच पदोन्नती धोरणात अनुभव व ज्येष्ठतेला प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक उद्या (९ जुलै) राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व्यासपीठाच्या…

Read More

योगिनी एकादशीनिमित्त १० जुलै रोजी सद्गुरु मियांसाब यांचा 81 वा पुण्यतिथी उत्सव…

समाधीस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन… ⚡सावंतवाडी, ता.०८-:प. पू. श्री सद्गुरू मियांसाब यांच्या 81 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी योगिनी एकादशीच्या पावन दिवशी समाधीस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सद्गुरूंचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले…

Read More

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोरील झाड कोसळले…

अनिल भिसे यांच्या स्टॉलचे नुकसान:मुसळधार पावसामुळे घटना; सुदैवाने जीवितहानी टळली. ⚡सावंतवाडी, ता. ८-:सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोरील अनिल भिसे यांच्या घरासमोर बुधवारी सकाळी अचानक झाड कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत सौ. भिसे यांचा व्यावसायिक स्टॉलचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे हे झाड अचानक उन्मळून पडल्याची प्राथमिक…

Read More

मतदारसंघातील वीज वितरणचा प्रश्न येता दोन दिवसात मार्गी लावा…

आमदार केसरकरांच अधिकाऱ्यांना निर्देश:अनुपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने बैठकीला बोलावले.. सावंतवाडी, ता. ७ : सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बैठकीच्या प्रारंभी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख आणि कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे अनुपस्थित असल्याने…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलच्या नागेंद्र तारीचा जिल्हा गुणवत्ता यादीत ४७ वा क्रमांक…

⚡मालवण ता.०७-:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) २०२६ मध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या शाळेचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी नागेंद्र युवराज तारी याने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत ४७ वा क्रमांक मिळविला. तसेच रेणुका गुरुनाथ चव्हाण आणि रिया…

Read More

रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी नीलम जोशी

मालवण (प्रतिनिधी) मालवण रोटरी क्लबची सन २०२६- २७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी नीलम जोशी यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी प्रविणा शिंदे व खजिनदारपदी प्रदीप सामंत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवीन पदाधिकारी व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. अविनाश पोतदार यांच्या हस्ते व…

Read More

मालवणातील मोकाट गुरांच्या प्रश्नी ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा…

मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना निवेदन सादर मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरात सध्या मोकाट गाई व गुरांमुळे अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली असून, यावर तात्काळ प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. शहरात फिरणाऱ्या या…

Read More

बाबी जोगी यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर नगर पालिका प्रशासनाला जाग…

देऊळवाडा- आंगणेवाडी मुख्य रस्त्यावरील कचऱ्याची केली स्वच्छता… मालवण, दि प्रतिनिधीठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी घेतलेल्या तीव्र आणि आक्रमक पवित्र्यामुळे अखेर मालवण नगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. देऊळवाडा, आडारी आणि आंगणेवाडी मुख्य रस्त्यावर पसरलेली डंपिंग ग्राउंडमधील घाण आज पालिका प्रशासनाने अग्निशमन बंबाच्या साहाय्याने पूर्णपणे धुवून स्वच्छ केली. प्रशासनाच्या या तातडीच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी…

Read More
You cannot copy content of this page