Headlines

आम.निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहरात सव्वा कोटी विकासनिधी मंजूर

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांची माहिती

मालवण (प्रतिनिधी)

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मालवण शहरात सातत्याने मोठया प्रमाणात विकासनिधी प्राप्त होत आहे. आताही जिल्हा नियोजन माध्यमातून सव्वा कोटी निधी मंजूर झाला आहे. यापुढेही अधिकाधिक निधी मंजूर होत राहील, अशी माहिती मालवण नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी दिली आहे.

मालवण शहरात सातत्याने विकासनिधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी आभार मानले आहेत. तसेच विरोधकांनी विकासनिधीचे आकडे मोजत राहावे, असा टोला सहदेव बापर्डेकर यांनी लगावला.

सव्वा कोटी निधीतून शहरात १४ विकासकामे मंजूर करण्यात आली. यात मालवण आडारी मेन रोड ते शिरोडकर घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरणं करणे (१० लाख), मालवण वायरी मेनरोड ते भर्डेवाडा अन्सुलकर घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (५ लाख ), मालवण वायरी मेनरोड ते हिंदळेकर घरापर्यंत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (५ लाख), मालवण वायरी मारुती मंदिर ते श्रीकांत वेंगुर्लेकर घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (५ लाख ), झांट्ये काजू फॅक्टरी समोरील औदुबर रस्ता ते दर्यासारंग हॉटेल पर्यंत गटार बांधणे व आर.सी.सी.ओतीव लाद्या बसविणे( १० लाख), समर्थ आंगण कॉर्नर ते साई मंदिर आर.सी.सी.गटार बांधणे ओतीव आर.सी.सी.लाद्या बसविणे(१० लाख), आडारी मेन रोड ते बाळा फाटक घरापर्यंत जाणारा रस्ता काँक्रीटिकरण करणे.(१० लाख), रांगोळी महाराज समोरील वसंत विहार इमारत ते पाटकर घरापर्यंत प्लेवर बॉक्स बसविणे.(१० लाख), भरड रिक्षा स्टॅण्ड ते निर्मिती नर्सरी दुतर्फा गटारावर आर.सी.सी.लाद्या बसविणे.(१० लाख ), मंत्री घर समोर ते साळगावकर घर आर.सी.सी. गटार बांधणे व आर.सी.सी. लाद्या बसविणे.(१० लाख), मालवण बंदर जेटी नवीन व जुनी जेटी ठिकाणी शोभिवंत सोलर लाईट बसविणे.(१० लाख), कोदेघर रस्ता डांबरीकरण करणे.(१० लाख), दुधवडकर घर ते रिक्षा नाका दांडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कव्हिंग बांधणे.(१० लाख), तानाजी नाका ते शेर्लेकर घर रस्त्याच्या दुतर्फा आर.सी.सी.गटार बांधणे.(१० लाख) यां कामांचा समावेश आहे. यापुढील टप्प्यात आणखीही कामे मंजूर होतील, असेही सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page