मनीष दळवी:वैभववाडी तालुक्याने नियमित कर्ज परतफेडीचा आदर्श घालून दिला, संगणकीकरणामुळे विकास संस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता..
⚡वैभववाडी ता.२९-: जिल्हा बँकेपासून सर्व यंत्रणा विकास संस्थांना सक्षम करण्यासाठी कामाला लागल्या आहेत. संस्थांचा कारभार अधिक पारदर्शक आणि गतिशील होणे ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी देशभरातील सर्व विकास संस्थांचे आर्थिक व्यवहार संगणकीकृत करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.
गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील सर्व संस्थांना संगणक व सॉफ्टवेअर देण्यात आले असून सचिवांनी प्रचंड मेहनत घेऊन संगणकीकरण १०० टक्के पूर्ण केले आहे. आज जमा, खर्च, कर्ज वाटप व वसुलीची प्रत्येक नोंद रोजच्या रोज म्हणजेच डायनॅमिक डे पद्धतीने होत आहे. त्यामुळे संस्थेचा व्यवहार त्याच क्षणाला जिल्हा बँक, सहकार विभाग, नाबार्ड, राज्य व केंद्र शासनाला दिसतो. यामुळे व्यवहारात सुसूत्रता आणि पारदर्शकता आली असून सभासदांचा विश्वास वाढला आहे.
पुढच्या काळात सभासदांना गतिशील सेवा देण्यासाठी मान्यताप्राप्त सचिव ही संकल्पना राज्य शासनाने २० वर्षांनंतर सहकार कायद्यात बदल करून आणली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७२ सचिवांच्या नेमणुका पूर्ण झाल्या असून उर्वरित ७३ सचिवांच्या नेमणुका अंतिम टप्प्यात आहेत.
वैभववाडी तालुक्याचे विशेष कौतुक करताना दळवी म्हणाले, “पूर्वी कुडाळ तालुका नियमित कर्जफेडीसाठी ओळखला जायचा, आता वैभववाडीने तो आदर्श मोडला आहे. जर कर्जाची १०० टक्के परतफेड कुठे होत असेल तर ती वैभववाडीत होते. कर्जमाफीपेक्षा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजारांऐवजी १ लाख रुपये प्रोत्साहन द्यावे. जसे आम्ही आज संस्थांचा सन्मान करतो, तसा प्रत्येक गावात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान झाला पाहिजे.”असे प्रतिपादन मनीष दळवी यांनी वैभववाडी येथे केले
१०० टक्के वसुली करणाऱ्या २२ विकास संस्थांचा जिल्हा बँकेच्या वतीने गौरव
वैभववाडी पंचायत समिती सभागृहात शनिवारी १०० टक्के कर्ज वसुली केलेल्या २२ विकास सेवा सहकारी संस्थांचा सत्कार सोहळा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
*१००टक्के वसुली केलेल्या संस्थांचा सत्कार केला त्या संस्था- दिर्बादेवी तिथवली, केदारलिंग करूळ, अचिर्णे, आदिष्टी खांबाळे, केदारलिंग हेत, गांगेश्वर भुईबावडा, महालक्ष्मी कोकिसरे, शिवाजी तिरवडे, शंकर प्रासादिक नाधवडे, ग्रामसेवा सोनाळी, श्रीराम नावळे, कुंभजाई कुंभवडे, सिद्ध गांगेश्वर उपळे, गांगेश्वर गडमठ, रवळनाथ एडगाव, छत्रपती शिवाजी अरुळे, ओम आखवणे, ठाणेश्वर नापणे, गांगो लोरे, एकविरा नानिवडे, प्रकाश कुर्ली, रवळनाथ सडूरे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई,यांनी प्रस्तावित केले
यावेळी संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगावकर, दिलीप रावराणे, माजी संचालक दिगंबर पाटील, चेअरमन सौ. सीमा नानीवडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक दत्ताराम गावडे, संगणक प्रमुख हडकर, ता.वि.अ. प्रल्हाद कुडतरकर, शाखा व्यवस्थापक सुरेश रावराणे उपस्थित होते.
