आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ कोल्हापूर व बांदा पर्यटात मारामारी…

⚡आंबोली,ता.१८-: आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ कोल्हापूर येथील पर्यटक आणि बांदा येथील पर्यटकात मारामारी झाली. यात दोन्ही बाजूनी एकमेकांना मारामारी झाल्यानंतर कोल्हापूर येथील पर्यटक घाटातील काडयांवर चडून पळाल्याची घटना घडली. दरम्यान उशिरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी हजर होते. याबाबत अधिक वृत्त असे,आंबोली येथे मंगळवारी संध्याकाळी ७ च्या दरम्यान कोल्हापूर आणि बांदा येथील पर्यटक यांच्यात बाचा…

Read More

नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनच घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१८-: मराठा समाज हॉल- पडतेवाडी, कुडाळ येथे घेतलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. या परीक्षेत इयत्ता पहिली मधील, कु. नित्या धुरी हिने प्रथम क्रमांक, कु. मिहिरा खटावकर हिने तृतीय क्रमांक, कु. भावेश कोठावळे व कु. नुरवी श्रृंगारे यांनी चौथा क्रमांक तर कु. समर्थ देसाई याने पाचवा…

Read More

शासकीय वनात भेरलेमाडाची पानं तोडणाऱ्या दोघांना वनविभागाच्या फिरतेपथक टीमने केले अटक…

⚡वेंगुर्ला ता.१८-: मातोंड येथील शासकीय वनात भेरलेमाडाच्या पानांची तोड करून तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या पथकाने तळवडे येथील दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई आज दुपारी मातोंड येथील जंगलात करण्यात आली.

Read More

कोकण पदवीधर’ मधून रमेश किर यांचा विजय निश्चित…

शशांक बावचकर:इंडिया आघाडीची कुडाळला बैठक;रमेश किर २१ जून ला सिंधुदुर्गात.. ⚡कुडाळ ता.१८-: गेल्या दहा वर्षात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे पदवीधरांच्या समस्या देखील वाढल्या आहेत. भाजपच्या उमेदवाने त्याकडे कानाडोळाच केलेला आहे. त्यांच्याबद्दल कोकणात नाराजी आहे. त्यामूळे कोकण पदवीधर मतदार संघात इंडिया आघाडीचे उमेदवार रमेश किर हे नक्की निवडून येतील असा विश्वास कोकण पदवीधर मतदार संघाचे सह…

Read More

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून सावंत कुटुंबीयांना धनादेश प्रदान…

⚡बांदा ता.१८-: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बांदा शाखेमार्फत डिंगणे येथील सावंत कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते सदर धनादेश श्रीमती सावंत यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शाखा व्यवस्थापक सीताराम गावडे, सहाय्यक व्यवस्थापक सुशील सावंत, गीतांजली…

Read More

फक्त मुद्दलाची परतफेड करण्याचा निर्णय विकास संस्थांना मारक…

मनीष दळवी:सहकार मंत्र्यांच्या आणून दिले निदर्शनास.. ⚡ओरोस ता.१८-: शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज ३० जून मुदतीने ६% व्याजदराने दिले जाते. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून व्याज परतावा मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांना सदरचे कर्जे शुन्य टक्के व्याज दराने उपलब्ध होते. शेतकऱ्यांना कर्जाची मुदतीत परतफेड करताना फक्त मुद्दलाची परतफेड करण्याबाबत सहकार विभागाकडून सूचना देण्यात आल्या…

Read More

निगुडे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताची तात्काळ डागडुजी करा…

समीर गावडे:अन्यथा २७ जून रोजी उपोषणास बसणार… ⚡बांदा ता.१८-: निगुडे तिलारी कालव्याचे पाईपलाईन टाकण्याचे काम ठिकठिकाणी चालू आहे परंतु गेले दोन वर्ष निगुडे या ठिकाणी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गाकडे मी स्वस्तिक कंट्रक्शन कंपनीने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे परंतु अद्याप पर्यंत दोन वर्ष झाले त्या ठिकाणी काम होत नाही आजूबाजूच्या शेतीत माती जाते तसेच निगुडे…

Read More

विशाल परब यांच्या माध्यमातून होडावडा बाजारपेठेत छत्री वाटप…

⚡सावंतवाडी ता.१८-: पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून होडावडा बाजारपेठेत छत्री वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी परब यांच्या जनसंपर्क कार्यालयातील प्रतिनिधींनी बाजारपेठेतील स्थानिक व्यापारी, व्यावसायिक यांना छत्रीचे वाटप केले. या आधी देखील विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग अशा…

Read More

बोलेरो- दुचाकी अपघातात एक ठार…

आंबोली नांगरतास येथील घटना: घटनास्थळी पोलिसांची धाव.. ⚡आंबोली ता.१८-: बोलेरो पिकपने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय तर अन्य त्याचा सहकारी जखमी झालाय. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडले घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णाला दाखल केले.

Read More

पाडलोस गाव ग्रुपच्या अध्यक्षपदी राजाराम गावडे तर सचिवपदी प्रणित गावडे यांची निवड…

⚡बांदा ता.१८-: पाडलोस रवळनाथ मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपच्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी राजाराम(पपी) गावडे यांची बहुमतांनी निवड करण्यात आली आहे. तर सचिव पदी प्रणित गावडे यांना सदस्यांनी पसंती दाखवली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी उपक्रम पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपतर्फे राबविले जातात.मावळते अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार…

Read More
You cannot copy content of this page