⚡बांदा ता.१८-: पाडलोस रवळनाथ मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपच्या विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी राजाराम(पपी) गावडे यांची बहुमतांनी निवड करण्यात आली आहे. तर सचिव पदी प्रणित गावडे यांना सदस्यांनी पसंती दाखवली.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी उपक्रम पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपतर्फे राबविले जातात.
मावळते अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्षपदी महेश पाडलोसकर, सहसचिव लक्ष्मण(बापू) माधव, खजिनदार अमेय गावडे, सहखजिनदार रोहित गावडे, प्रसार माध्यम विश्वनाथ नाईक व अंतर्गत हिशोब तपासणीस महेश गावडे यांची निवड करण्यात आली आहे.
मावळते अध्यक्ष लिंगाजी पाडलोसकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणीचे अभिनंदन केले. निवड प्रक्रिया अधिकारी म्हणून विश्राम गावडे यांनी काम पाहिले.
फोटो—–
राजाराम गावडे, प्रणित गावडे
