⚡बांदा ता.१८-: प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बांदा शाखेमार्फत डिंगणे येथील सावंत कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते सदर धनादेश श्रीमती सावंत यांना प्रदान करण्यात आला.
डिंगणे येथील दीपक आत्माराम सावंत यांचे ११ डिसेंबर २०२३ रोजी रस्ता अपघातात निधन झाले होते. जिल्हा बँकेच्या बांदा शाखेमार्फत सावंत यांच्या विम्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्ताव मंजूर होऊन २ लाख रुपयांचा धनादेश सावंत कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शाखा व्यवस्थापक सीताराम गावडे, सहाय्यक व्यवस्थापक सुशील सावंत, गीतांजली काजरेकर व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. सावंत कुटुंबियांतर्फे जिल्हा बँकेचे आभार मानण्यात आले.
फोटो –
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विम्याचा धनादेश सुपूर्द करताना श्वेता कोरगावकर. सोबत शाखा व्यवस्थापक सिताराम गावडे आदी.
