निगुडे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताची तात्काळ डागडुजी करा…

समीर गावडे:अन्यथा २७ जून रोजी उपोषणास बसणार…

⚡बांदा ता.१८-: निगुडे तिलारी कालव्याचे पाईपलाईन टाकण्याचे काम ठिकठिकाणी चालू आहे परंतु गेले दोन वर्ष निगुडे या ठिकाणी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गाकडे मी स्वस्तिक कंट्रक्शन कंपनीने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे परंतु अद्याप पर्यंत दोन वर्ष झाले त्या ठिकाणी काम होत नाही आजूबाजूच्या शेतीत माती जाते तसेच निगुडे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा खोदकाम केल्यामुळे चिखलमय झालेला आहे मृतदेह नेताना व लाकडे नेताना स्मशानभूमीकडे गाडी जात नसल्यामुळे व चालण्यास रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे अवघड होत आहे या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला तरी त्याची दखल घेतली जात नाही याकरिता आज कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव यांची निगुडे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

सदर निवेदत्यांनी सदर रस्त्याची येत्या आठ दिवसात डागडुजी न झाल्यास त्याच रस्त्यावर गुरुवार दिनांक 27 जून रोजी त्याच रस्त्यावर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे यावर श्री जाधव यांनी उपकार्यकारी अभियंता श्री अनिल मोहिते यांना सदरचे काम संबंधित ठेकेदाराला सांगून लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन दिले आहे यावेळी माजी उपसरपंच गुरुदास गवंडे उपस्थित होते

You cannot copy content of this page