आंबोली घाटात नियंत्रण सुटल्याने कारला अपघात…!

⚡आंबोली ता.०७-: आंबोली घाटात कारवरच नियंत्रण सुटल्याने गाडीचा अपघात झाला. यात सुदैवाने कोणाला मोठी दुखापत झाली नाही. मात्र, गाडीचे नुकसान झाले. नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला गेली.ग्रामस्थांच्या सहकार्याने गाडी बाहेर काढली.

Read More

अखेर वनविभागाने दहा तासांच्या शर्थच्या प्रयत्नाने बिबट्याला केले जेरबंद…!

⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या त्या बिबट्याला अखेर वनविभागाने दहा तासांच्या शर्थच्या प्रयत्नाने सायंकाळी ६ च्या सुमारास जेरबंद केले. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून तो कुठल्याही प्रकारे जखमी किंवा आजारी नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सावंतवाडी वनक्षेत्रपाल सुहास पाटील…

Read More

बजरंग दलातर्फे जानवली येथे वृक्षारोपण…

⚡कणकवली ता.०७-:बजरंग दलातर्फे १ ते ७ जुलै सेवा सप्ताह राबविण्यात आला. या अंतर्गत सोमवारी जानवली मारूती मंदिर शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग विभाग संयोजक दत्तप्रसाद ठाकूर, तालुका संयोजक नागेश मोगवीरा, अभि राणे, अमोल रासम, अमित मयेकर, शुभम तावडे, शंकर जंगम, निकेतन राणे, विश्व हिंदू परिषदेचे सुनील सावंत, नंदकुमार आरोलकर, राष्ट्रीय…

Read More

कणकवली बस स्थानक परिसरात महाराष्ट्र स्त्री मुक्ती संघटनेमार्फत महिला सेफ्टी ऑडिट…

सार्वजनिक ठिकाणे महिला स्नेही आणि महिलांसाठी सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ऑडिटचे आयोजन.. ⚡कणकवली ता.०७-: कणकवली बस स्थानक परिसरात महाराष्ट्र स्त्री मुक्ती संघटनेमार्फत महिला सेफ्टी ऑडिट करण्यात आले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही महिलांसाठी सुरक्षित असली पाहिजे या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणे महिला स्रेही आणि महिलांसाठी सुरक्षित करणे यासाठी तिथे निश्चित कोणते प्रश्न आहेत, सुरक्षिततेची व्यवस्था कशी आहे याबाबत…

Read More

जिथे परिवर्तन व चळवळ आहे तिथेच साक्षात विठ्ठल आहे- विठ्ठल कदम..

⚡मालवण ता.०७-: आज कालच्या मोबाईल संस्कृतीतही कवी साहित्य संमेलन यशस्वी होते. कवी संमेलनात समाज मनाचे दुःख मांडलं जातं. आपण शब्द ऐकतो ते हृदयात राहतात, कविता करतो त्या ओळी कधी पुसट होत नाहीत.चर्मकार समाज उन्नती मंडळांने पुढाकार घेऊन संपन्न केलेले साहित्य कवी संमेलन सर्व समाज मंडळांना आदर्शवतच आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री संध्या तांबे यांनी…

Read More

भगवंतगड- आचरा एसटी बस फेरी व्हाया लब्देवाडी मार्गे सुरू

ग्रामस्थांच्या मागणीला आम. निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे यश.. ⚡मालवण ता.०७-:भगवंतगड-आचरा एसटी बस फेरी व्हाया लब्देवाडी मार्गे सुरू करण्याची मागणी चिंदर गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केली असताना आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी पूर्ण झाली असून आज सोमवारी सकाळी सात वाजता माऊली मंदिरातून सुटणारी ही बस सेवा सुरु झाली. यामुळे आचरा हायस्कूलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना…

Read More

प्रिया चव्हाण आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्या मुलाला पोलिसांनी ताबडतोब अटक करावी…

अन्यथा, रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू: माजी आमदार वैभव नाईक यांचा इशारा.. सावंतवाडी : सावंतवाडीतील विवाहीता प्रिया चव्हाण हीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली मानेंसह मुलाला पोलिसांनी ताबडतोब अटक करावी. तसेच याप्रकरणी संशयित आरोपी प्रणाली मानेचे पती मिलिंद माने यांनाही आरोपी कराव. अन्यथा, रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू असा इशारा माजी आमदार…

Read More

धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबईच्या अध्यक्षपदी डॉ प्रदीप मिराशी…

तर कार्याध्यक्षपदी प्रदीप गोपाळराव परब मिराशी बिनविरोधनिवड.. ⚡मालवण ता.०७-:धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई या संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. प्रदीप शिवराम मिराशी तर कार्याध्यक्षपदी प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांची फेर निवड झाली आहे धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई या संस्थेची सर्वसाधारण सभा मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी झालेल्या निवडणुकीत सर्व सदस्यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली. या…

Read More

मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली मयत प्रिया चव्हाण कुटुंबीयांची भेट…!

⚡सावंतवाडी ता.०७-: माठेवाडा येथील प्रिया चव्हाण या विवाहितेने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या करून आपले जीवन संपविले होते. हि आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मयत प्रिया हिच्या वडिलांनी पोलिस तक्रार दाखल केली आहे. दरम्यान आज मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, शहर अध्यक्ष राजू कासकर, कलंबिस्त येथील माजी तालुका उपाध्यक्ष भाई देसाई व अन्य…

Read More

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात ख्रिस्ती समाजाची कारवाईची मागणी…

सावंतवाडी : आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅथोलिक समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या विधानांबद्दल पडळकरांवर कायदेशीर कारवाई करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोमन कॅथोलिक समाज अनेक शतकांपासून इतर समाजांसोबत सलोख्याने आणि…

Read More
You cannot copy content of this page