⚡मालवण ता.३०-:
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग हायस्कूलने
घवघवीत यश संपादन करतानाच प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.
अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग हायस्कूल ने शासकीय रेखाकला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्र शासनातर्फे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन शासकीय रेखाकला परीक्षांचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. सन 2025 -26 यावर्षी प्रशालेतील आठ विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी तर पाच विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट परीक्षेत सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला.
एलिमेंटरी परीक्षेत कुमारी गार्गी लिंगेश्वर नेवाळकर आणि इंटरमिजिएट परीक्षेत कुमार मयुरेश काशिनाथ चोडणेकर यांनी अ श्रेणी प्राप्त केली. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक श्री वसंत कृष्णा मेस्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर , संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, पालक, ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
