⚡सावंतवाडी, ता. ३०-:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२०२६ छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन, पेठवडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी पार पडली.
या स्पर्धेत श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता १२ वी कला शाखेतील विद्यार्थी नील सत्यवान बांदेकर याने १९ वर्षांखालील वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
नीलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद, क्रीडा शिक्षक तसेच सहाध्यायी विद्यार्थ्यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले असून त्याच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
