Headlines

शिंदे शिवसेनेच्या ताब्यातील देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…!

⚡मालवण ता.२९-: मालवण तालुक्यातील शिंदे शिवसेनेच्या ताब्यात असलेली एकमेव देवबाग ग्रामपंचायतच्या सरपंच उल्हास तांडेल यांसह उपसरपंच तात्या बिलये आणि ग्रा.पं. सदस्य रुपाली मोंडकर, प्रतिक्षा चोपडेकर, दत्तात्रय केळुसकर यांनी शिंदे गटाला सोडचिट्ठी देऊन श्री.रमेश कद्रेकर यांच्या माध्यमातून आम.वैभव नाईक व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेत ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे आम. नाईक…

Read More

लायन्स क्लब मालवणतर्फे शिवराज सावंत व प्रवीण कुबल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…!

⚡मालवण ता.२९-:लायन्स क्लब मालवणच्यावतीने मालवण येथील दांडी शाळेचे शिक्षक श्री. शिवराज सावंत आणि वायरी येथील रेकोबा हायस्कुलचे शिक्षक श्री. प्रवीण कुबल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश अंधारी, ज्येष्ठ लायन्स सभासद डॉ. शशिकांत झांट्ये, गणेश प्रभुलकर, खजिनदार सौ. पल्लवी खानोलकर आदी उपस्थित होते. डॉ. शशिकांत…

Read More

वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी आकाश कंदीलाच्या माध्यमातून दिला स्वच्छतेचा संदेश…!

मालवण दि प्रतिनिधी दिवाळी सणाचे औचित्य साधून वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या विद्यार्थ्यांनी कट्टा परिसरातील ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय तसेच सेतू सुविधा केंद्र या सार्वजनिक ठिकाणी पर्यावरण पूरक साहित्या पासून बनवलेले आकाश कंदील व स्वच्छता प्रतिज्ञा हस्तलिखित करून त्याचे वाटप केले. नागरिकांमध्ये ग्रामस्वच्छतेबाबत जागृती निर्माण व्हावी, व गाव स्वच्छ सुंदर व्हावा यासाठी या आकाश कंदीलांवर…

Read More

कुणकेश्वर आपण महोत्सव २०२४ चे ८ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन…

⚡देवगड ता.२९-: पारंपारिक रापण महोत्सव समिती कुणकेश्वर कुणकेश्वर कातवण, श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर व कातवण ग्रामपंचायत, कुणकेश्वर विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी,देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ८ नोव्हेंबर ते सोमवार ११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत रापण महोत्सव २०२४ चे आयोजन कुणकेश्वर येथे करण्यात आले आहे. या रापण महोत्सवाचे…

Read More

दीपक केसरकर यांना निवडून आणण्यासाठी एकजुटीने काम करा…

महेश सारंग: दोडामार्गात महायुतीची समन्वयक बैठक संपन्न… ⚡दोडामार्ग ता.२९-:* महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना निवडून आणण्यासाठी भाजपची समन्वयक बैठक आज महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी महेश सारंग यांनी मार्गदर्शन करत आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी एकत्र काम करावे असे आवाहन यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे….

Read More

निवडणूक निरीक्षकांनी घेतला विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाचा आढावा…!

सिंधुदुर्गनगरी ता.: भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानुसार निरीक्षकांचे जिल्ह्यात आगमन झाले असून आज जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य निरीक्षक श्री प्रविणकुमार थिंड, निवडणूक खर्च निरीक्षक श्रीमती के.जी. दिव्या, पोलिस निवडणूक निरीक्षक श्री दीपक रंजन यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या सोबत जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या…

Read More

बहुजन विचार मंच सिंधुदुर्गची कार्यकारिणी जाहीर…

अध्यक्षपदी सत्यवान साठे तर सचिवपदी साक्षी चेंदवणकर.. कुडाळ : फुले शाहू आंबेडकर बहुजन विचार मंच सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी सत्यवान साठे यांची तर सचिवपदी कु. साक्षी चेंदवाणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.रविवार दिनांक 27ऑकटोबर 2024 रोजी तेरसे बांबर्डे तालुका कुडाळ येथे सभा घेण्यात आली सदरच्या सभेत पुढील प्रमाणे कार्यकरणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष, सत्यवान साठे (उपवडे),…

Read More

कुडाळ मधून ८ जणांनी केले ११ अर्ज दाखल ; उद्या छाननी…

कुडाळ : विधानसभा निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात ८ जणांकडून ११ अर्ज दाखल झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वैभव विजय नाईक यांनी ३ तर शिवसेना पक्षाकडून निलेश नारायण राणे यांनी दोन अर्ज भरले आहेत.दि. २२ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली. त्यानंतर कुडाळ मतदार संघात…

Read More

सावंतवाडी मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे राहिला…

गुणाजी गावडे:स्थानिक आमदार कोणत्याही कार्यक्रमाशिवाय मतदारसंघात येतच नाहीत.. ⚡सावंतवाडी ता.२९-: गेल्या पंधरा वर्षांत विद्यमान आमदारांनी केवळ एकच आमसभा घेतली असून, त्यामुळे हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे राहिला आहे. असा आरोप वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी केला आहे. विकासकामे करण्यासाठी आमदारांना कोट्यवधी निधी मिळतो, तो निधी स्थानिक प्रतिनिधी ना विश्वासात घेऊन विकासकामावर खर्च करावा लागतो, परंतु,…

Read More

दीपक केसरकर चौथ्यांदा आमदार होणार…

पल्लवी केसरकर:जनतेचे आशीर्वाद, प्रेम त्यांच्यावर आहे.. सावंतवाडी : दीपक केसरकर यांनी केलेल्या कामामुळे जनतेचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. सलग तिनवेळा निवडून देत येथील जनतेने इतिहास रचला आहे. जनतेचे आशीर्वाद व प्रेम यामुळे ते चौथ्यांदा बहुमताने निवडून येतील अशी खात्री आहे असा विश्वास माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी कुटुंबासह…

Read More
You cannot copy content of this page