⚡मालवण ता.२९-:
लायन्स क्लब मालवणच्यावतीने मालवण येथील दांडी शाळेचे शिक्षक श्री. शिवराज सावंत आणि वायरी येथील रेकोबा हायस्कुलचे शिक्षक श्री. प्रवीण कुबल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश अंधारी, ज्येष्ठ लायन्स सभासद डॉ. शशिकांत झांट्ये, गणेश प्रभुलकर, खजिनदार सौ. पल्लवी खानोलकर आदी उपस्थित होते. डॉ. शशिकांत झांट्ये यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पल्लवी खानोलकर यांनी आतापर्यंत लायन्स क्लब मालवणने केलेल्या सेवाकार्याबद्दल माहिती दिली.
यावेळी शिवराज सावंत आणि प्रवीण कुबल यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी दोन्ही शिक्षकांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. दोन्ही शिक्षकांनी लायन्स क्लब मालवणने केलेल्या सत्कारासाठी क्लबचे आपल्या मनोगतातून आभार व्यक्त केले व भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश अंधारी यांनी दोन्हीं शिक्षकांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या. आभार गणेश प्रभुलकर यांनी मानले.
यावेळी अरविंद सराफ, शांती पटेल, महेश कारेकर, उदय घाटवळ, रुजारिओ पिंटो, उमेश शिरोडकर, श्याम नार्वेकर, गुरुनाथ ताम्हणकर, अंकुश कणेरकर, श्रीकृष्ण बागवे, अमर वाघमारे, वैशाली शंकरदास, राधिका मोंडकर, अंजली आचरेकर, अनुष्का चव्हाण, मीना घुर्ये, मनाली दळवी, नंदिनी गावकर, ऋग्वेदा धामापूरकर, मिताली मोंडकर, मनीषा गावकर, शर्वरी सावंत, प्राची कुबल तेजल ताम्हणकर, श्रद्धा बागवे, श्री. कणेरीकर आदी व इतर उपस्थित होते.
