सावंतवाडी मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे राहिला…

गुणाजी गावडे:स्थानिक आमदार कोणत्याही कार्यक्रमाशिवाय मतदारसंघात येतच नाहीत..

⚡सावंतवाडी ता.२९-: गेल्या पंधरा वर्षांत विद्यमान आमदारांनी केवळ एकच आमसभा घेतली असून, त्यामुळे हा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मागे राहिला आहे. असा आरोप वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी केला आहे.

विकासकामे करण्यासाठी आमदारांना कोट्यवधी निधी मिळतो, तो निधी स्थानिक प्रतिनिधी ना विश्वासात घेऊन विकासकामावर खर्च करावा लागतो, परंतु, स्थानिक आमदार कोणत्याही कार्यक्रमाशिवाय मतदारसंघात येतच नाहीत. आमसभेच्या परीक्षेत त्यांच्या निकाल अनुत्तीर्ण आहे. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या मतदारसंघात आता बदल हवा असेल तर आमदार देखील बदलणे गरजेचे असून, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांना मतदान करा असे आवाहन गुणाजी गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page