अध्यक्षपदी सत्यवान साठे तर सचिवपदी साक्षी चेंदवणकर..
कुडाळ : फुले शाहू आंबेडकर बहुजन विचार मंच सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी सत्यवान साठे यांची तर सचिवपदी कु. साक्षी चेंदवाणकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
रविवार दिनांक 27ऑकटोबर 2024 रोजी तेरसे बांबर्डे तालुका कुडाळ येथे सभा घेण्यात आली सदरच्या सभेत पुढील प्रमाणे कार्यकरणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष, सत्यवान साठे (उपवडे), सविव कु. साक्षी चेंदवाणकर(चेंदवण), उपाध्यक्ष रमाकांत जाधव,(तेरसेबांबर्डे )उपाध्यक्ष, विजया नेरुरकर(हळदीचे नेरूर), कोषध्यक्ष अमोल पावसकर (पावशी), कायदेशीर सल्लगार ऍड. स्वाती पालयेकर (सावंतवाडी) सल्लागार, एस व्ही. .बिबवणेकर (बिबावणे), संघटक, गुणाजी जाधव (तेरसेबांबर्डे) सहसचिव दिनेश जाधव (मोरे), संघटक वामन बांबर्डेकर (बांबर्डे), अनिल जाधव (साळगाव), सचिन मठकर (पुळास), सदस्य – नीता कदम (आंबेरी), दर्शना जाधव (मुळदे), लाडू जाधव (बांबर्डे ) अशी कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. यावेळी मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते, नवनिर्वचित कार्यकरणीचे उपस्थित कार्यकर्तेनीं अभिनंदन केले आहे.
छ. शिवाजी महाराज छ. शाहू महाराज म. फुले, सावित्रीमाई फुले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजापर्यंत पोहचविण्याचे काम गेली अनेक वर्षे पासून आपल्या सहकारऱ्याना सोबत घेऊन अध्यक्ष सत्यवान साठे करीत आहेत. मागासवर्गीय, बहुजन समाज्यावर होणारे अन्याय अत्याचार विरोधात अनेक वेळा मोर्चा, आंदोलने करून वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे, यापुढेही, फुले शाहू आंबेडकर विचार मंच सिंधुदुर्ग या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बहुजन समाज्यावर होणाऱ्या अन्याय विरुद्ध आवाज उठवीला जाणार असून महामानावंचे विचार समाज्याच्या शेवटच्या घटकपर्यंत पोहचविले जाणार असून त्या साठी ही संघटना काम करणार असल्याचे सत्यवान साठे यांनी सांगितले.
