वंचित बहुजन आघाडी कडून सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी…
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अधिकृतरित्या कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. असे असताना काही पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परस्पर निर्णय घेऊन एका उमेदवाराला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. याच अनुषंगाने प्रदीप कांबळे (सावंतवाडी शहर), मानसी सांगेलकर (सावंतवाडी शहर), आनंद जाधव (सहसचिव सावंतवाडी) नवसो कदम (तालुकाध्यक्ष – दोडामार्ग), तसेच चेतन जाधव,…
