संदेश पारकर:लोकशाही यायची असेल तर मुंबईवरून आलेले हे पार्सल परत मुंबईला पाठवले पाहिजे…
⚡वैभववाडी ता.०८-: आपला लढा हा सर्वसामान्य जनतेसाठी आहे संपत्ती कमावण्यासाठी नाही. गेली 35 वर्ष या जिल्ह्यावर राणे परिवाराची सत्ता आहे. या जिल्ह्याने त्यांना आमदार केले, मंत्री केले, मुख्यमंत्री केले त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले? केंद्रीय उद्योग मंत्री असताना त्यांनी एकही उद्योग धंदा,कारखाना या जिल्ह्यात आणला नाही. त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला.आमदार नितेश राणे यांची ओळख कमिशन घेणारा आमदार अशी झाली आहे. त्यामुळे जनतेमध्ये भ्रमनिरास झाला आहे. त्यांच्याकडे असलेले कार्यकर्ते हे कार्यकर्ते नसून बेनामी ठेकेदार आहेत. या ठेकेदारांमार्फत गावागावात दहशत निर्माण करून आमिषे दाखवून, पैसे देऊन मतदान घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात खऱ्या अर्थाने लोकशाही यायची असेल तर मुंबईवरून आलेले हे पार्सल परत मुंबईला पाठवले पाहिजे. अशी घणाघाती टीका महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी पारकर यांनी वैभव येथील सभेत केला
यावेळी खासदार विनायक राऊत शिवसेना नेते सतीश सावंत सुशांत नाईक संतोष पाटील मंगेश लोके भालचंद्र जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते.
