बांदा/प्रतिनिधी
वाचन संस्कृती टिकवणे ही काळाची गरज असून मुलांना शालेय स्तरावर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत शालेय मुलांसाठी शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयाच्यावतीने प्रकट वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व इयत्ता आठवी ते इयत्ता दहावी अशा दोन गटात होणार आहे. सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित आहे. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील दोन स्पर्धक स्विकारले जातील. तरी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांची नावे संबंधित शाळांनी दिनांक २७ नोव्हेंबर पर्यंत नट वाचनालयात आणून द्यावीत व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मो. ९४०५५७०३४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
