Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत पहाटेच्या सुमारास दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात…

⚡कणकवली ता.१५-: येथील रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले. चौकशी नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र या घटनेची शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून उलटसुलट प्रश्न उपस्थित होत…

Read More

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा…

जिल्हाधिकारी अनिल पाटील.. सिंधुदुर्ग दि १५ (जिमाका) नागरिकांना शासनामार्फत व शासनाच्या अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक व कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला आहे. या अधिनियमाअंतर्गत नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा देण्यसाठी ह्या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले. ००० ०००

Read More

वायरी येथील रेकोबा विद्यालयात राज्य क्रीडा दिन साजरा…

⚡मालवण ता.१५-:भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक कुस्ती वीर विजेते खाशाबा जाधव यांच्या जयंतीच्यानिमिताने मालवण वायरी येथील रेकोबा विद्यालयात राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने प्रशालेत कुस्ती वीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री सुहास हिंदळेकर व क्रीडामंत्री गौरांग मालंडकर याच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री प्रवीण कुबल यांनी खाशाबा जाधव यांच्या…

Read More

मालवण पंचायत समितीच्या क्रीडा महोत्सवाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते मशाल पेटवून उदघाटन…

⚡मालवण ता.१५-:मालवण पंचायत समिती यांचा वतीने अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातील तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उदघाटन टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे गटविकास अधिकारी तथा प्रशासक प्रफुल्ल वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ वाढवून तसेच ज्योत प्रज्वलीत करून मशाल पेटवत क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास…

Read More

अनधिकृत मासेमारीवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचे सत्र ठेवले सुरूच…

⚡मालवण ता.१५-:गेल्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात होणाऱ्या अनधिकृत मासेमारीवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले असून देवगड येथील समुद्रात अनधिकृतरित्या एलईडी लाईट द्वारे मासेमारी करणारी चांदणी १ (क्र. IND-MH-4-MM-758) ही नौका काल मंगळवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास समुद्रात गस्त घालत असताना सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी श्री. मुरारी भालेकर व…

Read More

देवगड महाविद्यालयास फिजिक्स मधून पीएच. डी. करण्यासाठीचे संशोधन केंद्र सुरू करण्यास मुंबई विद्यापीठाकडून मान्यता…

⚡देवगड ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित श्री. स. ह. केळकर महाविद्यालय, देवगड हे कोकण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक संधी मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांतून देवगड महाविद्यालयास फिजिक्स मधून पीएच. डी. करण्यासाठीचे संशोधन केंद्र सुरू करण्यास मुंबई विद्यापीठाकडून मान्यता देण्यात आली आहे. या संशोधन केंद्रामध्ये सध्या पदार्थविज्ञानामधील मूलभूत संशोधन करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत. पदवी…

Read More

दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंच मार्फत तालुका स्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन..

⚡देवगड ता.१५-:दीक्षित फाऊंडेशन मार्फत तालुक्यामधील शाळांना विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम व आर्थिक सहकार्य केले जाते. याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक विचार मंचामार्फत १६ जानेवारी २०२५ रोजी निरंजन दीक्षित यांच्या मातोश्री कै. निता नीलकंठ दीक्षित यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित केली आहे.स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही, विद्यार्थ्यांना चित्र पुरविले जाईल, रंगकामासाठी लागणारे साहित्य इत्यादी विद्यार्थ्यांनी…

Read More

हत्तींशी मराठीतून बोलणारा माणूस आनंद शिदे यांच्याशी विशेष संवादाचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.१५-: बॅ.नाथ पैंच्या ५४व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हत्तींशी मराठीतून बोलणारा माणूस तथा ट्रंक कॉल फाऊंडेशनचे संस्थापक आनंद शिदे यांच्याशी विशेष संवादाचे आयोजन १८ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता वेंगुर्ला-कॅम्प येथील बॅ.नाथ पै समुदाय केंद्र येथे केले आहे. फोटो – आनंद शिदे

Read More

कथाकथन स्पर्धेत कादंबरी मस्के प्रथम…!

⚡वेंगुर्ला ता.१५-: ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ या अभियानांतर्गत बॅ.खर्डेकर महाविद्यालयात कथाकथन सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये कांदबरी मस्के, सोनाली चेंदवणकर आणि सानिया वरसकर या विद्यार्थींनीनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले.

Read More

ठाकर समाजाला जात पडताळणीत होणाऱ्या त्रासाबद्दल आमदार निलेश राणेंची महत्त्वपूर्ण भूमिका…

निवेदनाद्वारे वेधले सामाजिक न्याय विभाग मंत्री संजय शिरसाट यांचे लक्ष:दिनकर पावरा यांची बदली करून सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची केली मागणी.. ⚡कुडाळ ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजाच्या होणाऱ्या जात पडताळणी प्रक्रियेत विलंब होत असल्याच्या तक्रारी कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांच्याकडे होत होत्या. त्यामुळं ठाकर समाजातील विद्यार्थी, लोकनियुक्त प्रतिनिधी, नोकरवर्ग यांना केवळ आर्थिक अपेक्षा…

Read More
You cannot copy content of this page