⚡मालवण ता.३१-:
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे साजरी करण्यात आली. काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या मालवण बाजारपेठेतील कार्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, आप्पा चव्हाण, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष सरदार ताजर, लक्ष्मीकांत परुळेकर, बबन तळावडेकर, बाबा मेंडीस, विरेश देऊलकर आदी उपस्थित होते.
