ॲड. दत्ताराम राजीव बिले यांचा युक्तिवाद..
कुडाळ : राहत्या झोपडीला आग लावून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून आरोपीत बाळकृष्ण विजय कुबल याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ऍड दत्ताराम राजीव बिले आणि ॲड. हेमांगी वराडकर यांनी काम पाहिले.
ऍड. दत्ताराम राजीव बिले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १७ मे २०२५ रोजी आडेली, गावठाण वाडी, वेंगुर्ला येथे रात्री १० वाजण्याच्या सुमारास संजना सत्यवान कुबल आणि तिची मुलगी दीक्षा कुबल या आपल्या झोपडीत झोपल्या होत्या। त्यावेळी आरोपी बाळकृष्ण विजय कुबल याने झोपडीच्या पाठीमागून आग लावली आणि त्याला आग लाऊन पळून जाताना संजना कुबल यांनी पाहिले. यानंतर संजना कुबल हिने आरडाओरड करून फिर्यादी संजना कुबलची सासू सीताबाई कुबल आणि उत्तम कुबल यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु झोपडी आणि त्यातील समान जळून गेले. त्यामुळे संजना सत्यवान कुबल हिने आरोपीविरुद्ध फिर्याद दिलेली होती.
पोलिसांनी आरोपी याला झोपडीचे नुकसान केल्यामुळे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, ३२४(४), ३२६(१) अन्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. आरोपीतर्फे ॲड. दत्ताराम राजीव बिले, आणि ॲड. हेमांगी वराडकर यांनी आरोपीच्या जमीनच काम पाहिले.
आरोपीतर्फे केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब हेमंत गायकवाड यांनी आरोपीला सशर्थ जामीन मंजूर केला आणि रक्कम रु. ५०,०००/- च्या जामीनावर मुक्त केले.
