…तर तहसीलदारी व कृषी अधिकारी यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढेल

संजू परब: तर आमदार दीपक केसरकर निश्चितपणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देतील..

⚡सावंतवाडी ता.३१-: गेले पंधरा दिवस अवकाळी धो धो पाऊस पडला या पडलेल्या पावसामुळे सह्याद्री पट्ट्यातील शेतकऱ्यांचे कोकम मिरची शेंगदाणे आधी पीक पूर्णपणे पाण्या त वाया गेले. असे असताना या शेतकऱ्यांच्या फळ पिकाचे पंचनामे करण्याची तसदी कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी घेतली नाही.. येत्या आठ दिवसात जर का शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे घेतले गेले नाहीत तर निश्चितपणे तहसीलदारी व कृषी अधिकारी यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा शिवसेना काढेल. असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सावंतवाडी तहसीलदार हे शेतकऱ्यांची कामे असली की त्यांची टंगळमंगळ सुरू होते आणि एरवी चिरे रेती वाळू चे डंपर अडवण्यासाठी. यांची सर्कल व यांची टीम वेळेवर पोहोचते ही टीम नेमके कशात गुंतले आहेत असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गंभीर टीकाही श्री परब यांनी केली..

आमदार दीपक केसरकर निश्चितपणे या बाधित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी शासनाकडून भरपाई निश्चितपणे मिळवून देतील मात्र हे प्रशासनातले अधिकारी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काहीच करायला बघत नाहीत यांचे आता करायचे तरी काय. असाच सवाल श्री परब यांनी केला..

You cannot copy content of this page