नावळे ग्रामपंचायतच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी…

⚡वैभववाडी ता.३१-: नावळे ग्रामपंचायतच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने गावातील कर्तुत्वान दोन महिला सौ साक्षी गुरव व सौ प्रणाली रावराणे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी आर डी जंगले, सरपंच सोनल गुरव उपसरपंच संजय रावराणे विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे कृषी विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर ग्रामपंचायत सदस्या रश्मी गुरव गंगाराम गुरखे पोलीस पाटील स्नेहा शेळके माजी सरपंच संभाजी रावराणे संजय पाटील ग्रामविकास अधिकारी अनिल घुगे आरोग्य सेविका रश्मी गोसावी अंगणवाडी सेविका अशा सेविका आदी गावातील महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नावळे ग्रामस्थांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवे यांचा सत्कार करण्यात आला.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील शेतकऱ्यांना नारळ रोपांचे वाटप करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवे गटविकास अधिकारी आर डी जंगले विस्तार अधिकारी लक्ष्मण हांडे सरपंच सोनल गुरव उपसरपंच संजय रावराणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार ग्रामविकास अधिकारी अनिल घुगे यांनी मानले.

You cannot copy content of this page