वैविध्यपूर्ण बोली भाषांमुळे मराठी भाषा समृद्ध – कवयित्री सरिता पवार…
⚡कणकवली ता.०२-: येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आपल्या प्रस्तावनेत मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश कामत म्हणाले की, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपण जागतिक मराठी भाषा दिन…
