Global Maharashtra Breaking News

वायंगणवाडी येथे मुख्य वीज वाहिनी कोसळल्याने शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू…

⚡बांदा ता.०८-: असनीये वायंगणवाडी येथे मुख्य वीज वाहिनी कोसळल्याने शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शेतकऱ्यासह इतर जनावरे बालंबाल बचावली. असनीये सरपंच रेश्मा सावंत, पोलीस पाटील विनायक कोळकटे यांच्यासह ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली असून महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, या मुख्य वीज वाहिनीचे काम चार दिवसांपूर्वी करण्यात आले…

Read More

दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या साईबाबांच्या पालखीचे होणार आगमन…

⚡सावंतवाडी ता.०८-: सालाबादप्रमाणे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी उद्या संध्याकाळी ठीक 5 वा. श्री साईबाबांच्या पालखीचे आगमन होणार आहे. दीपक केसरकर यांच्या हस्ते विधिवत पूजापाठ होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून दर्शन व तीर्थप्रसादचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच गुरुवार गुरुपौर्णिमेचा उत्सव असल्यामुळे सकाळी पालखीचे प्रस्थान श्री साईबाबामंदिर माडखोल येथे होणार…

Read More

सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी साटम यांची नियुक्ती…

नियोमी साटम या मूळ कणकवली तालुक्यातील.. ⚡कणकवली ता.०८-: सिंधुदुर्गच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नयोमी दशरथ साटम यांची नियुक्ती झाली आहे. साटम या मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते -फळसेवाडी येथील असून त्यांचे कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्याला असते. सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर येथून त्यांची सिंधुदुर्ग येथे बदली झाली आहे. नयोमी यांचे मूळ गाव पिसेकामते फळसेवाडी असले तरीही त्यांचे…

Read More

राणे महाराज मठात १० रोजी गुरुपौर्णिमा उत्सव…

⚡मालवण ता.०८-:मालवण तालुक्यातील कुसरवेवाडी येथील प. पू. राणे महाराज मठात गुरुवार दि. १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन राणे महाराज ट्रस्ट व राणे महाराज भक्तगण यांच्यातर्फे करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता राणे महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक व पादुका पूजन, ११ वाजता हरिनाम जप व नामस्मरण, वराड दुपारी १२ वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी…

Read More

राज्य अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत लीना धुरी हिला सुवर्णपदक…

⚡मालवण ता.०८-:पुणे येथे झालेल्या ७३ व्या खुल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मालवण गवंडीवाडा येथील सुकन्या लीना धुरी हिने ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना १०० × ४ रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावले. लीना धुरी ही मातोश्री ताई पाटकर अकॅडमी, मालवणची खेळाडू असून सध्या ती ठाणे येथे सराव करून ठाणे जिल्ह्यातून खेळत आहे. लीना धुरीला निलेश पाटकर व ताराचंद पाटकर…

Read More

उभादांडा शाळा सभागृह छप्पर दुरुस्ती काम पावसाळ्यानंतर…

पालकमंत्री नितेश राणे यांचे शाळा व्यवस्थापन समितीला आश्वासन.. वेंगुर्ला ता.०८-: उभादांडा शाळा नं.१ या शाळेच्या सभागृहाचे छप्पर काही दिवसांपूर्वी कोसळले. या सभागृहाच्या छप्पर दुरुस्तीबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी चर्चेद्वारे माहिती घेतली आणि या संदर्भात शाळेला निधी देण्याचे व पुढे पाऊस कमी झाला की लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासीत केले….

Read More

भाजपातर्फे ज्येष्ठ वारक-यांचा सन्मान..

⚡वेंगुर्ला ता.०८-: वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राच्या सामाजिक व आध्यात्मिक जीवनातील अनमोल परंपरा आहे. ‘वारी‘ ही श्रद्धा, सेवा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारी चळवळ आहे. ही परंपरा केवळ देवाच्या दर्शनापुरती मर्यादित नसून ती समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. याच परंपरेच्या सन्मानार्थ भाजपा सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘सन्मान वारक-यांचा‘ या विशेष कार्यक्रमांतर्गत २५ ज्येष्ठ वारक-यांचा सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम…

Read More

बालकांचे संरक्षण हे केवळ कायद्याचे नव्हे, तर समाजाचेही नैतिक कर्तव्य आहे…

न्यायाधीश एस. डी. गुंडेवाडी.. ⚡ओरोस ता ८-: बालकांचे संरक्षण हे केवळ कायद्याचे नव्हे, तर समाजाचेही नैतिक कर्तव्य आहे. पॉक्सो कायदा हा शिक्षेची भीती निर्माण करण्यासाठी नसून, प्रत्येक बालकाच्या सुरक्षिततेसाठी उभे करण्यात आलेले एक सक्षम कायदेपद्धतीचे उदाहरण आहे. पालक, शिक्षक, संस्था आणि विद्यार्थी यांनी याची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश सौ. एस. डी….

Read More

स्वयंरोजगारासाठी विविध प्रशिक्षणे…

किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचा पुढाकार:ब्रिगे सुधीर सावंत यांची माहिती.. ओरोस ता ८नैसर्गिक शेती, फळ प्रक्रिया प्रशिक्षण, रोपवाटिका, कुक्कुटपालन याबाबत जिल्ह्यातील जनतेला प्रशिक्षित करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले आहे.याबाबत माहिती…

Read More

स्वच्छ सर्व्हेक्षणसाठी जिल्ह्यातील नागरिकांनी ऑनलाईन अभिप्राय नोंदवा…

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे आवाहन.. ओरोस ता ८स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेवून स्वच्छ सर्वेक्षण ग्रमिण 2025 (SSG 2025) हे ॲप डाऊनलोड करुन अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र…

Read More
You cannot copy content of this page