Global Maharashtra Breaking News

ॲड. राजेश परुळेकर यांना पितृशोक…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयातील सेवानिवृत्त अधीक्षक गजानन तातोबा परुळेकर (वय 84, रा. कलमठ शिक्षक कॉलनी) यांचे आज 14 डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. ऍड. राजेश परुळेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चत मुलगा ऍड राजेश, विवाहित मुलगी, सून, नातू ऍड. ओंकार व अन्य नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रा आज सकाळी सव्वा अकरा…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार प्रदान…!

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करुन देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मा. मनिष दळवी साहेब यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी ग्राहकहित लक्षात घेऊन बँकेची सेवा अधिकच गतीमान केली असून शेतकऱ्यांना…

Read More

अखेर महावितरणकडून पिंगुळीवासियांच्या वीज समस्या मार्गी लावण्यास सुरुवात…

उबाठा शिवसेनेच्या अल्टिमेटमनंतर महावितरण ऍक्टिव.. कुडाळ, प्रतिनिधीपिंगुळी ग्रामीण भागात वीज समस्या गंभीर बनली असल्याने बुधवारी ठाकरे शिवसेना, पिंगुळी आणि समस्त पिंगुळीवासियांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले. तसेच पिंगुळी ग्रामीणमधील वीज समस्या ८ दिवसात न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला होता.ठाकरे शिवसेना आणि पिंगुळीवासियांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहता…

Read More

सावंतवाडीच्या राजघराण्यातील दाम्पत्याला देशस्तरावरील “सर्वोत्कृष्ट पुरस्कार”…

⚡सावंतवाडी ता.१३-: ट्रॅव्हल अधिक लीझर यांचा भारतातील सर्वोत्कृष्ट हेरिटेज पाककृती चॅम्पियन २०२४ हा अवार्ड सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे हा सोहळा संपन्न झाला. पाककलेचा हा परंपरागत वारसा यापुढेही जपणार असल्याचे प्रतिपादन युवराज, युवराज्ञींनी सत्कार स्वीकारताना केले. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी संस्थानमध्ये आजही परंपरागत चालत आलेल्या…

Read More

सावंतवाडीच्या व्यथा मुख्याधिकारी ना कानावर घेत, ना मनावर…

रवी जाधव:सुसंस्कृत व पर्यटनाकडे वाटचाल करणाऱ्या सावंतवाडी शहराला वाली कोण ?.. ⚡सावंतवाडी ता.१३-: नगरपालिकेवर प्रशासक बसल्यानंतर विकास काम अजून ठप्प होऊन मनमानी कारभाराला सुरुवात झाली. येथील नागरिकांना महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी सुद्धा आठ आठ दिवस वाट पाहावी लागते. तर शहरातील नुकतेच बनवलेले रस्ते अवघ्या दोन महिन्यातच वाहून गेलेत. शहरातील काही रस्त्यांमध्ये मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. सावंतवाडीच्या…

Read More

कुडाळ नगरपंचायतीमध्ये ‘स्वनिधी भी स्वाभिमान भी’ पंधरवडा शिबिराचे आयोजन…

⚡कुडाळ ता.१३-: कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ०१ जून २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ह्या योजनेची घोषणा केली आहे. सदर योजनेस जोडूनच केंद्र सरकारने स्वनिधी से समृद्धी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने भारत सरकार नवी दिल्ली यांनी स्वनिधी भी स्वाभिमान भी पंधरवाडा आयोजित करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार कुडाळ नगरपंचायत…

Read More

अणसूर पाल हायस्कूलची प्रतिकृती प्रथम…!

⚡वेंगुर्ला ता.१३-: नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अणसूर पाल हायस्कूलमधील दहावीतील साहिल गावडे याने विद्यार्थ्यांना स्वअभ्यासासाठी उपयुक्त ठरणा­­-या, अल्पखर्चिक सुक्ष्मदर्शक, प्लास्टोस्कोप या विज्ञानप्रतिकृतीचे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकाविला.

Read More

विज्ञान प्रदर्शनमध्ये वेतोरे हायस्कूलचे घवघवीत यश…!

⚡वेंगुर्ला ता.१३-: नुकत्याच संपन्न झालेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वेतोरे येथील श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.सौ.गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.

Read More

सुधाताई कामत शाळा नं २ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१३-: येथील सुधाताई कामत शाळा नं २ येथे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांची मोफत आरोग्य तपासणी करुन तपासणी केलेल्या मुलांना आवश्यक औषधे समता महिला मंडळाच्यावतीने मोफत देण्यात आली.यावेळी समता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ गायत्री देवस्थळी, सचिव सौ मंजिरी घोपेश्वरकर, खजिनदार सौ-प्राजक्ता पंतवालावलकर आणि…

Read More

मालवण कट्टा येथे आभाळमाया ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

⚡ओरोस ता १३-: सहकारमहर्षी कै.डी.बी.ढोलम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आभाळमाया ग्रुप आणि जी.एच.फिटनेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना काळापासून कट्टा पंचक्रोशीत सामाजिक कार्यासाठी सुरू झालेल्या आभाळमाया ग्रुप कडून २०२१ पासून सहकारमहर्षी कै.डी.बी.ढोलम साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेकॉर्डब्रेक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात…

Read More
You cannot copy content of this page