चिन्मय तांडेल यांनी पटकावले विजेतेपद..
कुडाळ : रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५२ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. चिन्मय तांडेल यांनी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
पहिल्या वर्षी एकूण १५२ स्पर्धक सहभागी होऊन स्पर्धेचा उत्साह द्विगुणित केला. या स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला प्रत्येकी ५ नारळ रणझुंझार मित्रमंडळा कडून देण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन रुपेश पावसकर , दाजी गावकर बाळा घाडी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व गाऱ्हाणे घालून करण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून पंचक्रोशीतील सुधीर नेरुरकर आणि उमेश परब यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे सूत्रसंचलन पंचक्रोशीतील सुनील करवडकर यांनी केले. या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन किशोर सावंत, गोट्या पाटकर, नरेंद्र नेरूरकर, प्रवीण नेरुरकर, कल्पेश मार्गी, सुधीर नेरुरकर, अमरदीप कदम, पंडित घाडी, दर्शन साऊळ, पंकज कलिंगण, सतीश सावंत यांनी केले.
या स्पर्धेसाठी ज्येष्ठ समाजसेवक अशोक पावसकर, कल्पेश पावसकर, रुद्रेश पावसकर, बाळा पावसकर, कु. हार्दिक टेंबुलकर उपस्थित होते. स्पर्धेचे विजेते चिन्मय उल्हास तांडेल यांना रोख रक्कम ५००१/- व चषक रुपेश पावसकर, प्रवीण नेरुरकर, बाळा पावसकर यांच्या शुभहस्ते देण्यात आले. द्वितीय क्रमांक रोख रक्कम रुपये ३००१/- व चषक श्री.रुपेश पावसकर, बाळा घाडी व आनंद नेरुरकर यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
या स्पर्धेस हाजीम मुजावर, प्रकाश साऊळ, अमोल श्रृंगारे, नरेंद्र घाडी, अनिकेत मेस्त्री, गिरीश नेरुरकर, ग्रामपंचायत सदस्य शंभूराज नाईक, आनंद नेरुरकर, राजेश तेंडूलकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.