अखिल कोकण विकास महासंघाने केला कलेचा गौरव..
ओरोस ता ११
कोकणचे बालगंधर्व व दशावतारी कलेतील ज्येष्ठ स्त्री कलाकार ओमप्रकाश चव्हाण यांना अखिल कोकण विकास महासंघ यांच्यावतीने कोकण रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वत ओमप्रकाश व त्यांची पत्नी सौ नयना या दोघांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अखिल कोकण विकास महासंघाच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रात कोकणचे नाव उज्वल करणाऱ्या व्यक्तींचा कोकण रत्न हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाच्या १८ व्या वर्षी कोकणातील १४ जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील व्यक्तींचा यात समावेश होता. या पुरस्कारांचे वितरण आठ ऑगस्ट रोजी डोंबिवली पश्चिम येथील घनश्याम गुप्ते मार्गावरील सामाजिक मंदिर सभागृहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी कोकणचे बालगंधर्व ओम प्रकाश चव्हाण यांना कोकण रत्न हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष तानाजी परब कार्याध्यक्ष मनीष दाभोलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळ:- डोंबिवली:-