कुडाळ नगर पंचायतचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…

⚡कुडाळ ता.११-: कुडाळ नगरपंचायतीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त लोकप्रतिनिधीसह कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग दर्शवला.
कुडाळ नगरपंचायतीची स्थापना १० ऑगस्ट २०१५ रोजी झाली. त्यानंतर दरवर्षी नगरपंचायतीचा वर्धापन दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त सत्यनारायण महापूजा व कर्मचारी लोकप्रतिनिधी यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी सत्यनारायण महापूजा नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर व उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर या दांपत्याच्या हस्ते झाली. पूजेनंतर महिला भजन मंडळाचे भजन झाले. तसेच भैरववाडी येथील फुगडी संघाची फुगडी झाली. स्थानिक भजने आणि नंतर लोकप्रतिनिधींसह कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने संपन्न झाले. या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्वजण सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page