सावंतवाडीत उद्या ठाकरे शिवसेनेचाबीएसएनएलच्या विरोधात मोर्चा…
⚡सावंतवाडी,ता.२८: शहरातील बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. कॉल न लागणे, वारंवार कॉल कट होणे अशा समस्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी ठाकरे शिवसेना उद्या सकाळी १०.३० वाजता बीएसएनएल कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार आहे.याबाबतची माहिती तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी दिली.
