Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरला FLNAT परीक्षा११०० नवसाक्षर लाभार्थी देणार परीक्षा; उत्तीर्णांना केंद्र शासनाचे प्रमाणपत्र…

⚡सिंधुदुर्ग, दि.२२-: केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (NBSK) सन २०२६-२७ मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद, सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागामार्फत होणाऱ्या या परीक्षेसाठी जिल्ह्यातील सुमारे ११०० नोंदणीकृत असाक्षर लाभार्थी प्रविष्ट होणार आहेत.
वय वर्षे १५ पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींना साक्षर करून त्यांच्यामध्ये वाचन, लेखन व संख्याज्ञान ही मूलभूत कौशल्ये विकसित करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या तीन कौशल्यांवर आधारित प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांचे मूल्यमापन FLNAT परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. ही परीक्षा तालुकानिहाय सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून, परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या परीक्षेच्या आयोजनाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामद, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी कौतुक करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक तसेच उल्लास स्वयंसेवक शिक्षक परिश्रम घेत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक असाक्षर व्यक्तींना साक्षरतेच्या प्रवाहात आणून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
00000

You cannot copy content of this page