⚡मालवण ता.०२-:
कोकण परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी मंगळवारी दुपारी सपत्नीक रामेश्वर मंदिरास भेट देत रामेश्वरासह संस्थानच्या सार्वजनिक गणेशाचे दर्शन घेतले.
यावेळी देवस्थान समिती खजिनदार कपिल गुरव यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी त्यांच्या सोबत आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांसह इतर पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते.
