बादेकर ट्रस्टतर्फे रेवतळे शाळेला दोन संगणक संच भेट…

⚡मालवण ता.०२-:
मराठी शाळेतील मुलांना संगणकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मालवण येथील कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रेवतळे जि. प. प्राथमिक शाळेला दोन संगणक संच भेट देण्यात आले.

बादेकर ट्रस्टतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात, यातीलच एक भाग म्हणून शाळेला संगणक भेट देण्यात आले आहेत, असे अध्यक्ष गणेश बादेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बादेकर, सचिव श्रीधर बादेकर, खजिनदार सौगंधराज बादेकर, सदस्य राजीव बादेकर, निनाद बादेकर, ललित चव्हाण, सचिन हडकर, स्वाती मसुरकर, संध्या मेस्त्री, मुख्याध्यापक देवीदास प्रभूगावकर, उपक्रमशील शिक्षक श्री. घोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सौगंधराज बादेकर यांनी ट्रस्टच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. सामाजिक, शौक्षणिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने ट्रस्टची निर्मिती करण्यात आली असून समाजातील सर्वसामान्यांना हक्काचा आधार देण्यासाठी ट्रस्टतर्फे कार्यक्रम घेण्यात येत आहेत, असे स्पष्ट केले. मुख्याध्यापक प्रभूगावकर यांनी ट्रस्टचे आभार मानत सर्वसामान्यांना, गरीब कुटुंबियांना संगणकीय शिक्षणाचा फायदा राबविण्यात आलेला कौतुकास्पद असल्याचे सांगिलते. सूत्रसंचालन श्री. घोडगे यांनी केले.

You cannot copy content of this page