मतदारसंघातील प्रत्येक गावाचा विकास करणे ही माझी जबाबदारी…
संजू परब :सातोसेतील श्री वंसदेव ब्राह्मण देवस्थानतर्फे श्री. परब यांचा सत्कार… बांदा : सातोसे गावातील स्ट्रीट लाईटसाठी १५ लाखाचा निधी उपलब्ध करून हा प्रश्न मार्गी लावला. गावातील क्रिकेट स्पर्धा तसेच इतर कार्यक्रमांसाठी माझी नेहमी मदत असते. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून या मंदिरासाठी ५ लाखांचा निधी देण्यात आला. तुमचं माझ्यावरील प्रेम असंच राहूदे….
