चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद:पोलिसांसमोर शोध घेण्याच आवाहन..
कणकवली : कणकवली शहरात सारस्वत बँकेसमोरून रविवारी रात्री दोन अज्ञात चोरट्यानी मोटारसायकल चोरीचा प्रयत्न केला. मोटारसायकल उभ्या केलेल्या ठिकाणापासून सुमारे 300 मीटर अंतरापर्यंत चोरट्यानी मोटारसायकल ढकलत नेली. परंतु मोटरसायकल सुरू न झाल्यामुळे मोटरसायकल तिथेच टाकून चोरटे पसार झाले. दुचाकी मालकाने मोटरसायकलचा शोध घेत कणकवली पोलीस ठाणे गाठले. दरम्यान शोधाशोध होत असताना मोटरसायकल सोमवारी सायंकाळी सापडली. दुचाकी चोरणारे चोरटे दोघेजण असून ते सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरा दिसणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन हे पोलिसांसमोर उभे राहिले आहे.