मनीष दळवी:एसआरएम कॉलेज मध्ये अंतिम फेरी संपन्न,राखी सावंत गृप प्रथम..
कुडाळ : आकार फाऊंडेशन, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि एमआयडीसी असोसीएशन यांनी संयुक्तरित्या राबविलेल्या उद्योजक निर्माण करण्याच्या स्तुत्य प्रयोगाला जिल्हास्तरावर व्यापक रूप देण्यासाठी जिल्हा बॅक पुढाकार घेणार आहे. असे गौरवोद्गार जिल्हा बॅक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले. आज शिक्षण क्षेत्रात अशाच अभिनव प्रयोगाची आवश्यकता असल्याचेही श्री. दळवी यांनी सांगितले. उद्योजकतेच्या वाटेवर युवा विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल म्हणजेच आकार फाउंडेशन आणि संत राऊळ महाराज कॉलेज आयोजित फ्युचरप्रेन्युअर्स स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. त्याच्या पारितोषिक वितरण समारंभावेळी मनीष दळवी बोलत होते.
युवा उद्योजकतेला चालना देणारी, आकार फाउंडेशन आणि संत राऊळ महाराज कॉलेज आयोजित फ्युचरप्रेन्युअर्स स्पर्धेची अंतिम फेरी बुधवारी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाली. एकूण पाच टीम्सनी अंतिम फेरीत स्थान मिळवत आपली सर्जनशीलता व उद्योजकतेची क्षमता सादर केली.
या स्पर्धेच्या परीक्षक मंडळामध्ये तीन परीक्षक मोहन होडावडेकर, नितीन वाळके आणि गजानन कांदळगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे बारकाईने परीक्षण केले व त्यातून विजेत्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली प्लेट्स, स्किन केअर ॲप, टुरिझम वेबसाईट, फ्लॉवर मेकिंग, आणि इंटिरियर डिझायनिंग यासारख्या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन केले. यामध्ये प्रथम क्रमांक- राखी सावंत, मानसी सावंत आणि गीता खानोलकर- रोख रक्कम 7000 व सन्मानचिन्ह. द्वितीय क्रमांक- हर्षदा शिर्के-रोख रक्कम 5000 व सन्मानचिन्ह. तृतीय क्रमांक- संकेत कुलकर्णी सॅम डिसोजा, यश हडकर, कार्तिक मसुरकर -रोख रक्कम 3000 व सन्मानचिन्ह. चतुर्थ क्रमांक- पूर्वा मिसाळ-रोख रक्कम 1000 व सन्मानचिन्ह. पाचवा क्रमांक- तनिषा मालवणकर-रोख रक्कम 1000 व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, तरुण भारत संवादचे संपादक शेखर सामंत, तसेच MIDC असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नितीन वाळके, आकार फाउंडेशनचे संस्थापक गजानन कांदळगावकर, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष राजीव पवार, संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, नगरसेविका सौ. संध्या तेरसे, कमशीप्र मंडळाचे महेंद्र गवस व अविनाश वालावलकर हे मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या टीम्सना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आली.
यावेळी मनीष दळवी, शेखर सामंत, मोहन होडावडेकर, नितीन वाळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गजानन कांदळगावकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राध्यापिका गीताश्री पवार आणि सुवर्णा निकम, तसेच BMS आणि BAF च्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी अनंत वैद्य सर, सचिन मदने, राजेंद्र केसरकर, शशिकांत चव्हाण, सौ.नीता गोवेकर, श्री शेवडे सर, प्रमोद भोगटे, डॉ.रवींद्र जोशी, लोखंडे सर, ठाकूर सर, राकेश वर्दम, लक्ष्मीकांत परब,प्रज्ञा वालावलकर, गुरु कुरतडकर, हर्षल कदम तसेच जिल्ह्यातील विविध कॉलेजचे प्राध्यापक व बँकेचे अधिकारी यांनी या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करून त्यांना उद्योजकतेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कुडाळ एमआयडीसी असोसिएशन, जिल्हा व्यापारी महासंघ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.