जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश…!

⚡सावंतवाडी ता.११-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन ओरोस येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस टूर्नामेंट मध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या वयोगटांमध्ये रेजल गोम्स हिने प्रथम स्थान, काव्या कारेकर हिने द्वितीय स्थान, चेसिया डिसोजा हिने तृतीय स्थान, शांभवी घोगळे हिने चतुर्थ स्थान व जॉयसी मेंडीस हिने पाचवे स्थान पटकावले आहे.
14 वर्षाखालील मुलांच्या वयोगटामध्ये आदिल शेख याने प्रथम स्थान तर हर्षल गुंजाळ याने तृतीय स्थान मोहित सारंग याने पाचवे स्थान मिळवले आहे.
17 वर्षाखालील मुलींच्या वयोगटांमध्ये वेदा गावडे हीने तृतीय स्थान तर निधी कानविंदे हिने चतुर्थ स्थान पटकावले आहे.
17 वर्षाखालील मुलांच्या वयोगटांमध्ये गौरांग सावंत याने द्वितीय स्थान तर जॉर्डन डान्स याने पाचवे स्थान मिळवले आहे.
सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री हितेश मालंडकर व श्रीम.शेरॉन अल्फांसो यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना,पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page