Global Maharashtra Breaking News

करूळ मध्ये एसटी मोटरसायकल मध्ये अपघात;एक गंभीर जखमी…

⚡वैभववाडी ता.१२-: तालुक्यातील करूळ खडकवाडी येथे एसटी बस व मोटार सायकल यांच्यात झालेल्या धडकेत मोटार सायकलस्वार विश्वनाथ (बबन) सावंत वय 56 वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना वैभववाडी येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरस येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडला. सावंत आपल्या मोटर सायकलने गावातच जात असताना खडकवाडी…

Read More

डोंगरपाल श्री सिद्धेश्वर महापुरुषाचा भंडारा उत्सव उत्साहात संपन्न…

बांदा (प्रतिनिधी) :    डोंगरपाल येथील अत्यंत जागृत व संततीच्या नवसाला पावणारे देवस्थान अशी ख्याती असलेल्या श्री सिद्धपुरुषाचा भंडारा उत्सव उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिवसभरात हजारो भाविकांनी श्री दर्शन घेत नवसफेड केली. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्याचप्रमाणे डोंगरपाल येथील सीधाचा डोंगरावर एका सिद्धपुरुषाने सुमारे ३०० वर्षांपूर्वी जिवंत समाधी घेतली. त्या ठिकाणी भंडारा पौर्णिमेला दरवर्षी उत्सव साजरा करण्यात येतो. संततीच्या नवसाला पावणारे…

Read More

बांदा केंद्र शाळेतील पाककृती स्पर्धेत निवेदिता शाॅ विजेत्या तर रूचि महाले उपविजेत्या…

बांदा ता.१२-: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेत निवेदिता आशिष शाॅ यांनी प्रथम तर रुचि रूपेश‌ महाले यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.भारत हा जगातील तृणधान्य पिकवणारा प्रमुख देश आहे . सध्या आपल्या राज्यात व देशात तृणधान्याचे क्षेत्र कमी होत असल्याचे दिसून येत आहे तसेच…

Read More

कणकवली शहरातील सुतारवाडी व माईन सुतारवाडी येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी…

कणकवली : कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. कणकवली शहरातील सुतारवाडी व माईन सुतारवाडी येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी संपन्न झाली. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विश्वकर्मा जयंतीला उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी सुतारवाडी मंडळाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक…

Read More

श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी एसटीच्या १०० बस गाड्या जादा सोडणार…

श्री कुणकेश्वर यात्रेच्या निवोजन बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना:वीज आणि मोबाईल नेटवर्क सक्षम करा. स्वच्छ शौचालय व्यवस्था निर्माण करून द्या.. ⚡ओरोस ता.१२-:महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी कुणकेश्वर भक्तांना ये – जा करण्यासाठी किमान शंभर एसटी बस गाड्यांची व्यवस्था करा. कुणकेश्वर भक्तांना कोणत्याच कारणास्तव त्रास होत नाही याची काळजी घ्या. वीज वितरण व्यवस्था सक्षम मोबाईल…

Read More

चिमुकल्या बाळाच्या अंत्यविधीला जाताना काळाचा घाला…

चौके येथील अपघातात नंदकुमार राणे यांचे दुर्दैवी निधन.. ⚡मालवण ता.१२-: चिमुकल्या बाळाच्या अंत्यविधिसाठी दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीने धडक दिल्याने चौके स्मशानभूमीजवळ आज सकाळच्या सुमारास घडलेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चौके थळकरवाडी बाजारपेठ येथील किराणा व्यापारी आणि आदर्श व्यापारी संघ चौकेचे अध्यक्ष नंदकुमार हिरोजी राणे (वय ५४) यांचे उपचार सुरु असतानाच निधन…

Read More

आफ्रिन करोल आणि अक्षता खटावकर यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी…

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान सदस्या आफरीन करोल आणि अक्षता खटावकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी ही माहिती दिली आहे.

Read More

मळेवाड येथील २० फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळा…

⚡सावंतवाडी ता.१२-: श्री गजानन महाराज मंदिर मळेवाड येथे गुरुवार २० फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील प्रमाणे कार्यक्रम गुरुवार २० रोजी सकाळी ६.३० ते ९ वाजता पाद्यपूजा,व पंचामृत महाअभिषेक आणि महापूजा सकाळी ९.३० ते १२ वाजता श्री दत्तमालामंत्र अनुष्ठान,दुपारी १२.३० ते १ वाजता महाराजांची महाआरती प्रकट समय,दुपारी १ ते ३ वाजेपर्यत…

Read More

गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या शैक्षणिक मार्गदर्शन वर्गाची सांगता…

⚡सावंतवाडी ता.१२-: आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान हे गेली चार वर्षे शैक्षणिक कार्य करीत आहे. यावर्षीदेखील शैक्षणिक मार्गदर्शन करताना एकूण सुमारे दीडशे तास मार्गदर्शन करण्यात आले.पाचवी स्कॉलरशिप,आठवी स्कॉलरशिप, आठवीसाठी गणित प्राविण आदी विषयानुरूप मार्गदर्शन करण्यात आले. हे सर्व मार्गदर्शन वर्ग विनामूल्य होते. प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जुलै महिन्यात पाचवी आणि आठवीच्या मुलाला स्कॉलरशिप पुस्तकेही भेट…

Read More

गोगटे गुरुजी प्रतिष्ठानच्या शैक्षणिक मार्गदर्शन वर्गाची सांगता…

⚡सावंतवाडी ता.१२-: आजगाव येथील पूज्य गोगटे गुरुजी स्मृती प्रतिष्ठान हे गेली चार वर्षे शैक्षणिक कार्य करीत आहे. यावर्षीदेखील शैक्षणिक मार्गदर्शन करताना एकूण सुमारे दीडशे तास मार्गदर्शन करण्यात आले.पाचवी स्कॉलरशिप,आठवी स्कॉलरशिप, आठवीसाठी गणित प्राविण आदी विषयानुरूप मार्गदर्शन करण्यात आले. हे सर्व मार्गदर्शन वर्ग विनामूल्य होते. प्रतिष्ठानतर्फे यावर्षी जुलै महिन्यात पाचवी आणि आठवीच्या मुलाला स्कॉलरशिप पुस्तकेही भेट…

Read More
You cannot copy content of this page