⚡मालवण ता.०४-:
आगामी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका लढवण्याची इच्छा राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे त्यांना संधी देण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांचे लक्ष वेधण्यात यावे असा एकमुखी निर्णय
मालवण येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सेवादल काँग्रेसच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादल पदाधिकारी जिल्हास्तरीय बैठक राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी राष्ट्रीय काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या वायरी येथील हॉटेलमध्ये संपन्न झाली. या बैठकीला सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, आप्पा चव्हाण, युवक काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, कृष्णा धाऊसकर, संदीप सुकी, आप्पा चव्हाण, मधुकर लुडबे, सागर पुजारे, चंदन पांगे, सौ. प्राची माणगावकर, महेंद्र मांजरेकर, अशोक राणे, विजय खाडे, अंकुश पारकर, कांता गवस, संजय लाड, शिवा गावडे, जेरॉन रोड्रिंक्स, मेघश्याम लुडबे, विष्णू देऊलकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवादल तालुका अध्यक्ष तसेंच जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सेवादल विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कार्याचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकी मध्ये सेवादल विभागाचे पदाधिकारी निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने काही ठिकाणी त्यांना देखील संधी देण्याबाबत पक्षश्रेष्ठी कडे मागणी करण्यात येणार आहे, असे यावेळी ठरविण्यात आले.
मोदी सरकारचा दहा वर्षातील भ्रष्ट कारभार यावर जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच वाढती महागाई, बेरोजगारी अशा अनेक मुद्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मेघनाद धुरी, बाळू अंधारी, रवींद्र म्हापसेकर, आप्पा चव्हाण, देवानंद लुडबे, जेम्स फर्नांडिस, सौ. प्राची माणगावकर यांनी देखील विचार मांडले.
