मालवण तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत देवबागच्या हायस्कुलच्या बाल गटाचे यश…

⚡मालवण ता.०४-:
क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने पोईप हायस्कूलच्या मैदानावर आयोजित तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग प्रशालेच्या बाल गट मुलांच्या संघाने लक्षवेधी कामगिरी करत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलच्या संघाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रथमच पात्र होण्याची ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या विजयी संघात ओमकार कुमठेकर (कर्णधार), नेहाल राऊळ, ऋषभ खराडे, वेदांत घाटवळ, आरव कोळंबकर, अर्वीन परिकर, सार्थक सारंग, आयुष गोवेकर, कौस्तुभ चोपडेकर आणि दर्श चोपडेकर या खेळाडूंचा समावेश होता.या सर्व खेळाडूंना श्री. घेवडे यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी आणि सदस्य, पालक तसेच ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.

You cannot copy content of this page