⚡बांदा ता.०५-: कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून सोमवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सालाबाप्रमाणे यंदाही येथील काणेकर कुटुंबीयांतर्फे श्री साईबाबांचा उत्सव साजरा होत आहे. यावर्षी या उत्सवाला ७२ वर्षे पूर्ण होत आहेत.
यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन काणेकर कुटुंबीय यांच्या घरी करण्यात आले आहेत. सोमवार दिनांक ६ रोजी सकाळी १० वाजता साईबाबांची महापूजा, दुपारी १२ वाजता श्री साईबाबांची आरती, दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद, संध्याकाळी ४ वाजले पासून तीर्थप्रसाद. रात्री ९ वाजता पहिल्या सत्रात गोव्यातील सुप्रसिद्ध नामवंत भजन सम्राट पांडुरंग राऊळ, विठ्ठल शिरोडकर, प्रल्हाद गवस यांचा पारंपारिक भजनाचा कार्यक्रम होईल. यासाठी साथ संगत तबला मिलिंद परब, जिग्नेश पेडणेकर, मोहन पेडणेकर, संवादिनी अमोल गावस यांची लाभणार आहे.
दुसऱ्या सत्रात रात्री ठीक ११ वाजता गोवा राज्यातील सुप्रसिद्ध जयपुर घराण्याच्या हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका सौ. प्रचला आमोणकर, गोवा यांचा सदाबहार शास्त्रीय, उपशास्त्रीय नाट्यसंगीत, अभंगवाणी असा गायणाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी साथसंगत तबला श्री. पं. तुळशीदास नावलेकर, संवादिनी आकाश जलमी हे करतील. तिसऱ्या सत्रात पं. राजा काळे यांचे शिष्य सुभाष परवार, गोवा यांचा शास्त्रीय उपशास्त्रीय, अभंग, नाट्यसंगीत असा गायनाचा कार्यक्रम होईल. यासाठी साथसंगत तबला बुद्धेश तळकर, संवादिनी सुनाद कोरगावकर हे करतील. तरी रसिक व श्रोत्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील काणेकर कुटुंबीय यांनी केले आहे.
