श्री देव कुडाळेश्वर मंदिरात कोजागिरी पौर्णिमी निमित्त विविध कार्यक्रम…

भजन स्पर्धा बक्षीस वितरणसह विश्वजित बोरवणकर यांची ‘अभंगवारी’..

⚡कुडाळ ता.०५-: येथील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात सोमवार दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १०.०० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, रात्रौ ०८.३० वाजता ५०व्या भजन स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा होणार आहे. बक्षिस वितरण विश्वजीत बोरवणकर व मे. लक्ष्मी ज्वेलर्सचे राजू पाटणकर यांचे हस्ते होणार आहे. बक्षिस वितरण सोहळ्यानंतर रात्रो ९.०० वाजता मुंबई येथील सारेगम फेम प्रसिद्ध तरुण गायक विश्वजीत बोरवणकर यांचा अभंगवारी हा भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे, तरी सर्वांनी भक्तीगीत श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page